मनोरंजन

सिनेमातून जगण्याची दिशा मिळते - सागर तळाशीकर

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर - सिनेमाचे माध्यम केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर जगण्याची दिशा मिळण्यासाठी प्रभावी आहे. विद्यार्थ्यांनी शालेय वयातच आशयघन सिनेमांशी मैत्री करावी, असा मौलिक मंत्र आज अभिनेता सागर तळाशीकर यांनी दिला.

येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळ आणि महापालिका शिक्षण मंडळाच्या तिसऱ्या बालचित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. येथील शाहू स्मारक भवनात या महोत्सवाला प्रारंभ झाला.

दरम्यान, महोत्सवाची थीम असणाऱ्या पतंग उडविणाऱ्या मुलीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विद्यार्थिनीच्या हस्ते पतंगाच्या प्रतिकृतीचे अनावरण करुन अभिनव पध्दतीने या महोत्सवाचे उद्‌घाटन झाले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी "दिल्ली सफारी', "रॅटिट्यूएल' आणि "ऍडव्हेंचर्स ऑफ टिनटिन' हे चित्रपट दाखविण्यात आले. 

सागर तळाशीकर म्हणाले, ""जगभरात विविध भाषांमध्ये सिनेमे तयार होतात. त्यांच्या अनुभवातून आलेले चित्रपट पाहण्यामागे आपण कसे जगतो, याचे सारही मांडलेले असते. म्हणूनच हे चित्रपट कसे पहायचे हे जाणून घेतले पाहिजे. प्रत्येक मुलाच्या आयुष्याचाही एक सिनेमा असतो. त्याचे हिरो तुम्ही असता. तुमच्या आयुष्याचे गणित कसे सोडवायचे, हव्या असलेल्या ठिकाणी कसे पोहोचायचे, याचा विचार करणारी दिशा सिनेमातून मिळवायची असते. चिल्लर पार्टीच्या या उपक्रमाचे त्यासाठीच योगदान मोठे आहे.'' 

प्राथमिक शिक्षण मंडळ समितीच्या सभापती वनिता अशोक देठे यांनीही चिल्लर पार्टीच्या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमाला महानगरपालिका नेहमीच मदतीचा हात पुढे करत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

ओंकार कांबळे याने प्रास्ताविक केले. अर्शद महालकरी याने पाहुण्यांचा परिचय करुन दिला. युवराज देशमुख याने आभार मानले. सागर तळाशीकर यांचा शिवप्रभा लाड यांनी तर वनिता देठे यांचे अभय बकरे यांच्या हस्ते पुस्तकेभेट देउन स्वागत झाले. प्रशासनाधिकारी विश्वास सुतार, चिल्लर पार्टीचे समन्वयक मिलिंद यादव, सचिन पाटील, रविंद्र शिंदे, नसीम यादव, समीक्षा फराकटे, गुलाबराव देशमुख, चंद्रशेखर तुदीगाल, विठ्ठल लगळी, सिध्दी नलावडे, श्रीराम जाधव, अभिजीत कांबळे, ए.के.शिंदे, अनिल काजवे आदी उपस्थित होते. 

उद्या महोत्सवात... 

  • सकाळी नऊ वाजता -  दि बीएफजी

  • दुपारी बारा वाजता -  बोल्ट

  • दुपारी तीन वाजता - दि नट जॉब 

........ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT