maharashtrachi hasyajatra fame vanita kharat play villain in upcoming marathi serial sundari  Esakal
मनोरंजन

Vanita Kharat: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरात होणार 'साहेब', या मालिकेत पहिल्यांदाच साकारणार खलनायिका

वनिता खरात या मराठी मालिकेत पहिल्यांदाच खलनायिका म्हणुन भेटीला येत आहे

Devendra Jadhav

Vanita Kharat News: वनिता खरात ही महाराष्ट्राची हास्यजत्रामधील लोकप्रिय अभिनेत्री. वनिताने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोमध्ये विविध भुमिका साकारुन प्रेक्षकांंचं मन जिंकलंय. वनिता खरातच्या कॉमेडी अभिनयाचे अनेक फॅन्स आहेत.

आता वनिताच्या फॅन्ससाठी खुशखबर. वनिता खरात पहिल्यांदाच खलनायिकेच्या भुमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जाणुन घ्या सविस्तर.

(maharashtrachi hasyajatra fame vanita kharat play villain in upcoming marathi serial sundari)

वनिता खरात या मालिकेत साकारणार खलनायिका

‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेचे नवीन पर्व नुकतेच सुरु झाले आहे. या मालिकेत वनिता खरात झळकणार आहे.

सुंदरी मालिकेच्या नवीन पर्वात सुंदरीच्या आयुष्याचा नवीन आणि आव्हानात्मक प्रवास सुरु झालाय. पण आता सुंदरीच्या प्रवासात एक अडचण म्हणजे ‘साहेब’. या 'साहेब' भुमिकेच्या निमित्ताने वनिता पहिल्यांदाच खलनायिका म्हणुन समोर येणार आहे.

‘साहेब’ या नावाप्रमाणेच त्या व्यक्तीचं व्यक्तीमत्व देखील भारदस्त, बेधडक, जिगरबाज असणार यात शंका नाही. ‘साहेब’ या खलनायिकेची भूमिका वनिता खरात साकारत आहे. नुकताच वनिताच्या भूमिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला असून वनिताला या अनोख्या भूमिकेत पाहणं प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार हे नक्की.

तू जरी असली कलेक्टर तरी कायदा हा साहेबाचा चालतो, या दमदार डायलॉगमुळे वनिताच्या भूमिकेचा अंदाज प्रेक्षकांना आलाच असेल.

आता साहेब आणि सुंदरी समोरासमोर आल्यावर नेमकं काय होणार. सुंदरी ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त ‘सन मराठी’वर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT