Ashvini Mahangade on Maratha Reservation: "आता नाही तर कधीच नाही", अभिनेत्रीचा मराठा आरक्षण लढ्यात सहभाग

आई कुठे काय करते मधील अभिनेत्रीने मराठा आरक्षण आंदोलनात सहभाग घेतलाय
ashvini mahangade from aai kuthe kay karte support maratha reservation andolan manoj jarange patil
ashvini mahangade from aai kuthe kay karte support maratha reservation andolan manoj jarange patil SAKAL

Maratha Reservation News: मराठा आरक्षणाचा लढा सध्या चर्चेत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा सातवा दिवस आहे. महाराष्ट्रभरातुन अनेक लोकं मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत.

मराठा आरक्षणासाठी आई कुठे काय करते मधील एक अभिनेत्री लढ्यात सहभागी झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे.

(ashvini mahangade from aai kuthe kay karte support maratha reservation andolan manoj jarange patil)

ashvini mahangade from aai kuthe kay karte support maratha reservation andolan manoj jarange patil
Dunki Teaser: ठरलं तर! या दिवशी येणार शाहरुखच्या 'डंकी'चा टिझर, सर्वांना उत्सुकता

अश्विनी मराठा आंदोलन लढ्यात झाली सहभागी

अश्विनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. अश्विनीने मराठा आंदोलनासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना समर्थन केलंय. अश्विनीने साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना भेट देऊन खास व्हिडीओ पोस्ट केलाय.

अश्विनीने मराठा आरक्षण आंदोलनासाठी लिहीली खास पोस्ट

अश्विनीने या व्हिडीओखाली अश्विनीने कॅप्शन लिहीलंय,

"आता नाही तर कधीच नाही........
विद्यार्थी ...
स्वप्नं...
मेहनत...
परीक्षा...
उत्तिर्ण....
यश...
तरीही अपयश...
मग आक्रोश...
यातना...
मग परत परीक्षा....
मग परत सगळे तेच आधीचे पाढे...
आणि मग आत्महत्या....
हे गेले किती तरी वर्ष सुरू आहे आणि या पुढे हे होणार नाही यासाठी उभे राहायला हवे.
या लढ्यात मी भाग होणे हे माझे कर्तव्य आहे."

रितेश देशमुखने सुद्धा मराठा आंदोलनाला दिला पाठिंबा

रितेश देशमुखने X वर मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण आंदोलनाचा फोटो शेअर केलाय. त्यावर रितेश लिहीतो, "जय शिवराय, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजातल्या मागास घटकांच्या न्याय्य मागणीसाठी जरांगे पाटील शांतीपूर्ण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या तब्येतीसाठी मी प्रार्थना चिंततो. आणि या प्रश्नावर तातडीने तोडगा निघेल अशी अपेक्षा बाळगतो."

ashvini mahangade from aai kuthe kay karte support maratha reservation andolan manoj jarange patil
Urfi Javed: राजपाल यादवचा 'भुलभुलैया' लुक केल्यामुळे उर्फीला मिळाली जीवे मारण्याची धमकी

शांततेत आंदोलन करण्याचं जरांगेंचं आवाहन

"मराठा समाजाला आवाहन आहे शांततेत आंदोलन करा आत्महत्या करू नका". असे मनोज जरांगे यांनी सांगितले. उपोषणाच्या 6 व्या दिवशी हि मनोज जरांगे यांनी वैद्यकिय उपचार नाकारले. समाज बांधव व महिला यांनी पाणी घेण्यासाठी मोठा आग्रह जरांगे यांना केला तेव्हा विनंतीचा मान ठेवुन दोन घोट पाणी जरांगे यांनी घेतले. या वेळी जरांगे यांना अश्रू अनावर झाले डोळ्यात पाणी आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com