Ankush Chaudhari
Ankush Chaudhari  Instagram
मनोरंजन

अभिनेता अंकुश चौधरीला कोरोना

स्वाती वेमूल

प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि 'मी होणार सुपरस्टार' या शोचा परीक्षक अंकुश चौधरीला (Ankush Chaudhari) कोरोनाची लागण झाली आहे. अंकुशने ट्विट करत याविषयीची माहिती दिली. 'नमस्कार, माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू आहेत आणि तुमचे आशीर्वाद आहेच. कोरोनावर मात करून पुन्हा त्याच जोशात आणि त्याच जोमात तुमच्यासमोर येईन', असं त्याने ट्विटरवर लिहिलं आहे. त्याचप्रमाणे अंकुशच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी आणि काळजी घ्यावी अशी विनंतीदेखील त्याने केली आहे.

अंकुश सध्या क्वारंटाइनमध्ये राहत असून योग्य ती काळजी घेत आहे. अंकुशच्या या ट्विटवर अनेकांनी त्याला काळजी घेण्यास सांगितलं आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत असल्याचंही चाहत्यांनी लिहिलं आहे. याआधी प्रेम चोप्रा, डेलनाज इरानी, जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया, एकता कपूर, सुमोना चक्रवर्ती यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे.

मुंबईत बुधवारी दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांक नोंदविण्यात आला. दिवसभरात १५ हजार १६६ रुग्णांची नोंद झाली असून, बाधितांचं प्रमाण थेट २५ टक्क्यांवर गेलं. मुंबईत दुसऱ्या लाटेत सर्वाधिक म्हणजे ११ हजार १०० रुग्ण एका दिवसात आढळले होते. दुसऱ्या लाटेत हा उच्चांक गाठण्यास सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लागला होता. मात्र आता ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे पंधरा दिवसांत दैनंदिन रुग्णसंख्येने १५ हजारांचा टप्पा ओलांडला. बुधवारी मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्याही एक हजाराच्या वर होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Cotton Seeds : पहिल्याच दिवशी कपाशी बियाण्यांचा अत्यल्प पुरवठा; आजपासून कापूस बियाणे विक्रीचा होता मुहूर्त

MS Dhoni: धोनी RCB ला देणार सरप्राईज? CSK ने शेअर केलेल्या त्या व्हिडिओने चर्चांना सुरुवात

Share Market Today: अमेरिकन बाजार विक्रमी उच्चांकावरून कोसळले; भारतीय शेअर बाजारात कशी असेल स्थिती?

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

SCROLL FOR NEXT