marathi movie Shivrayancha Chhava Teaser out now this actor played the role chhatrapati sambhaji
marathi movie Shivrayancha Chhava Teaser out now this actor played the role chhatrapati sambhaji SAKAL
मनोरंजन

Shivrayancha Chhava Teaser: 'शिवरायांचा छावा'चा टिजर, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता

Devendra Jadhav

Shivrayancha Chhava Teaser News: 'शिवरायांचा छावा' सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाच्या पोस्टरपासूनच सिनेमाबद्दल प्रचंड चर्चा आहे.

अशातच दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावाचा आज भन्नाट टिजर रिलीज झालाय. या टिजरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा झालाय.

हा अभिनेता साकारणार छत्रपती संभाजी महाराज

शिवरायांचा छावा सिनेमाचा टिजर रिलीज झालाय. या टिजरमध्ये घनदाट जंगलात हिंस्त्र वाघाचा सामना करणारा शिवरायांचा छावा अर्थात छत्रपती संभाजी महाराज दिसतात. त्यांचा हात जखमी दिसतो. संभाजी महाराज वाघाचा सामना करत त्याच्या शेपटीला धरुन त्याला ओढत आणतात.

अंगावर काटा आणणाऱ्या या टिजरमध्ये अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.

'शिवरायांचा छावा' चित्रपटाचं पहिलं लक्षवेधी पोस्टर

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल.

मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आणि तेव्हापासून एकच चर्चा रंगली ती म्हणजे 'शिवरायांचा छावा' साकारणार कोण..?

या तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच आपल्या समोर येणार आहे. त्यापुर्वी 'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या पहिल्या लक्षवेधी पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढली होती.

या तारखेला येणार शिवरायांचा छावा भेटीला

'शिवरायांचा छावा' चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी प्रियांका मयेकर यांनी सांभाळली आहे तर संकलन सागर शिंदे यांचे आहे. सिनेमात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.

चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी ए. ए . फिल्म्स सांभाळत आहे. नववर्षात म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२४ ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Iran Helicopter Crash : इराणच्या राष्ट्राध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या 'बेल 212' हेलिकॉप्टरमुळे अनेकांनी गमावलाय जीव ; जोडलं जातंय अमेरिकेच नाव

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

SCROLL FOR NEXT