Urfi Javed Hospitalised: उर्फी जावेद रुग्णालयात दाखल! फोटो पोस्ट करत म्हणाली...

उर्फी जावेदला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय
actress and model urfi javed hospitalised share photo and inform her fans
actress and model urfi javed hospitalised share photo and inform her fansSAKAL

Urfi Javed News: उर्फी जावेद ही तिच्या फॅशन सेन्समुळे कायम चर्चेत असते. उर्फीला अनेकदा तिच्या अतरंगी फॅशन सेन्समुळे कौतुक कमी तर लोकांच्या टिकेचा जास्त सामना करत असते.

अशातच उर्फीच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीय. उर्फीला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. उर्फीने सोशल मीडियावर हॉस्पीटलमधला फोटो पोस्ट करुन ही बातमी शेअर केली.

actress and model urfi javed hospitalised share photo and inform her fans
Captain Miller Controversy: धनुषच्या 'कॅप्टन मिलर'च्या इव्हेंटमध्ये महिलेचा विनयभंग? व्हायरल व्हिडीओने खळबळ

उर्फीने शेअर केला हॉस्पीटलमधला फोटो

उर्फी जावेदने नुकतंच हॉस्पीटलमधला फोटो शेअर केलाय. यामध्ये उर्फीच्या तोंडावर ऑक्सीजन मास्क दिसत असून ती बेडवर झोपलेली दिसतेय. तिने कॅमेरासाठी दोन हात करुन खास पोज दिलीय.

उर्फीने या पोस्टच्या खाली कॅप्शन लिहीलंय. "Starting 2024 with a bang." त्यामुळे उर्फीच्या चाहत्यांना तिची काळजी लागून राहिलीय. अनेकांनी कमेंट करत ती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केलीय.

actress and model urfi javed hospitalised share photo and inform her fans
Shivrayancha Chhava Teaser: 'शिवरायांचा छावा'चा टिजर, छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकणार हा अभिनेता

उर्फीने पोस्ट डिलीट केली

उर्फीने सोशल मीडियावर फोटो टाकताच अल्पावधीत तिच्या फॅन्सनी लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव केला. यानंतर काहीच वेळात उर्फीने पोस्ट डिलीट केली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. आता उर्फीच्या तब्येतीबद्दल अनेकजण तर्कवितर्क लावत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com