'phulrani' Marathi Movie Google
मनोरंजन

Phulrani: 'भक्ती बर्वेंना रिप्लेस करणारी एकच..',सुबोध सोबत 'फुलराणी' मध्ये कोण? नेटकऱ्यानं ठणकावून सांगितलं

'फुलराणी' सिनेमात मध्यवर्ती भूमिकेत कोण अभिनेत्री दिसणार यावरनं सोशल मीडियावर सध्या सेलिब्रिटींपासून सर्वसामान्य नेटकऱ्यांपर्यंत चर्चा रंगली आहे.

प्रणाली मोरे

Phulrani Marathi Movie: ती येणार... ती येणार... असं मागील वर्षभरापासून कानावर येत होतं, उत्सुकता वाढली होती, कुतूहल जागं झालं होतं, पण कोण ती, राणी की महाराणी? छे होSSS, ही तर 'फुलराणी'... बरं ही फुलराणी आहे तरी कोण? याचं आणखी वेगळं कुतूहल. लवकरच या कुतुहलाचं उत्तर मिळणार आहे.

तुमच्या, आमच्या, सर्वांच्या लाडक्या 'फुलराणी'ची झलक पहायला मिळणार आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्चला सिनेमागृहात 'फुलराणी' भेटणार आहे, पण त्यापूर्वी १३ फेब्रुवारीला 'फुलराणी' प्रत्यक्ष अवतरणार आहे.

यावेळी 'फुलराणी'चा फर्स्ट लूक सोशल माध्यमातून रिव्हील करण्यात येणार आहे. (Marathi Movie Subodh Bhave phulrani who is actress in movie, netizens demand)

सुबोध भावे सोबत 'फुलराणी' सिनेमात कोण दिसणार यावरनं सध्या सोशल मीडियावर जाहिर करण्याआधीच जोरदार चर्चा रंगली आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींनी आपापल्या इन्स्टा हॅंडलवर 'फुलराणी' संदर्भात उत्सुकता जागृत करण्यासाठी पोस्ट केली आहे.

ज्यात प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे 'फुलराणी' अखेर कोण साकारणार. आता खरंतर काही अभिनेत्रींनी भक्ती बर्वे यांच्या निधनानंतर हे धनुष्य पेललं आहे पण तरीही आता प्रेक्षकांनाही वेगळी अभिनेत्री 'फुलराणी'च्या रुपात पहायची आहे.

जो तो आपापल्या आवडीच्या अभिनेत्रीचं नाव घेताना दिसत आहे. कुणी मुक्ता बर्वे,कुणी सई ताम्हणकर कुणी गिरिजा ओक,कुणी हृता दुर्गुळे तर कुणी सायली संजीव...

आता सायली संजीवचं नाव आलंच आहे म्हणून सांगतो की,सायलीनंही 'फुलराणी' ची ती पोस्ट शेअर केली अन् लागलीच त्यावर अनेक कमेंट्स येऊ लागल्या.

त्यावर एका नेटकऱ्यानं चक्क सायलीच्या त्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, ''भक्ती बर्वेंना कुणी रिप्लेस करु शकत असेल तर ती तुच...'', आता खरंतर सायलीसाठी ही मोठी दाद म्हणावी लागेल.

कारण भक्ती बर्वेंनी 'ती फुलराणी' मधील भूमिका एका उंचीवर नेऊन ठेवलीय. तिथं अद्याप तरी कुणी पोहोचलेलं नाही. अर्थात ज्या अभिनेत्रींनी 'फुलराणी' साकारलीय ती उत्तमच आहे..पण भक्ती बर्वे एकच असतात नाही का?

विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack: नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; सर्वांसमोर नेले उचलून, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन महाकालीच्या दर्शनासाठी निघाले अन्..

वयाच्या ८८ व्या वर्षीही मर्दानी खेळांचा थरार! शांताबाई पवार यांची प्रेरणादायी कहाणी |Shantabai Pawar

रस्त्याचं काम सुरु असतानाच भरधाव कारची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण गंभीर

Gokul Election Voting Percentage : गोकुळसाठी ९९.९६ % मतदान; सतेज पाटील, हसन मुश्रीफांची प्रतिष्ठा पणाला, उद्या मतमोजणी, कोण मारणार बाजी?, तालुका निहाय आकडेवारी

Gokul Milk Union Election 2026 : गोकुळच्या मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेरा; मतपत्रीकेचे फोटो व्हायरल, नजर चुकवून मोबाईलवर काढले फोटो

SCROLL FOR NEXT