'बाप जन्मात यापुढे कोणताही बायोपिक करणार नाही' सुबोधनं हात जोडले|Subodh Bhave statement | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subodh Bhave

Subodh Bhave: 'बाप जन्मात यापुढे कोणताही बायोपिक करणार नाही' सुबोधनं हात जोडले

Subodh Bhave marathi actor Har Har Mahadev movie : मराठी चित्रपट विश्वाशी संबंधित एक धक्कादायक बातमी आहे. ती म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनं एक मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर ती बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केली आहे. कोल्हापूरातील काही शिवभक्तांनी अभिनेता सुबोधची भेट घेतली होती. त्यानंतर त्यानं जी प्रतिक्रिया दिली ती व्हायरल झाली आहे.

हर हर महादेव या चित्रपटावरुन गेल्या महिन्यापासून मोठा वाद रंगल्याचे दिसून आले आहे. या चित्रपटामध्ये शिवकालीन इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी आपला संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांना केवळ हर हर महादेवच नाही तर महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटावरही टीका केली होती. त्यातील कलाकार त्यांचे दिसणे, त्यांची वेषभूषा यावरुन त्यांनी आक्षेप घेतला होता. मावळ्यांची वेषभूषा अशाप्रकारची असते का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

संभाजीराजेंनी हर हर महादेववर देखील टीका केली होती. या चित्रपटामध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचे म्हटले होते. त्यांनी आता यापुढील काळात कोणताही ऐतिहासिक चित्रपच प्रदर्शित करण्यापूर्वी इतिहासकार आणि इतिहास अभ्यासकांची वेगळी समिती नेमावी आणि त्यांना चित्रपट दाखवून तो प्रदर्शित केला जावा असे मत व्यक्त केले होते. यासगळ्यात सुबोध भावेची प्रतिक्रियाही समोर आली आहे.

हेही वाचा: Tejaswini Pandit: 'घरभाडं द्यायला गेले, नगरसेवकानं मला…’ तेजस्विनीचा धक्कादायक खुलासा

सुबोधनं प्रतिक्रिया देताना आपण यापुढील काळात आपण कोणताही ऐतिहासिक भूमिका करणार नाही. असे म्हटले आहे. बापजन्मात आपण बायोपिक करणार नाही. आता शुट करत असलेला हा शेवटचा बायोपिक चित्रपट असेल अशी भूमिका आता सुबोधनं घेतली आहे. त्याची ही प्रतिक्रिया व्हायरल होताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.