Subodh Bhave: बोलून कंटाळलो आता! सुबोध भावेची राज्य सरकार वर तीव्र नाराजी.. म्हणाला, | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Subodh Bhave 
 Vaalvi Marathi

Subodh Bhave: बोलून कंटाळलो आता! सुबोध भावेची राज्य सरकार वर तीव्र नाराजी.. म्हणाला,

मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजेच सुबोध भावे (subodh bhave). सुबोध वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका नेहमी साकारत असतो आणि त्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे वेगळे स्थानही निर्माण केले आहे. तो सध्या त्याच्या 'वाळवी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा: Subodh Bhave Fulrani: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर फुलणार 'फुलराणी'

या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये तो व्यस्त आहे. खरं तर तो नेहमीच त्यांच्या स्पष्ट मतासाठीही ओळखला जातो. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सरकारविषयी आणि मराठी चित्रपटाच्या धोरणाविषयी त्याचं स्पष्ट मत माडलं. मराठी चित्रपटांबद्दल महाराष्ट्र सरकारचं उदासीन असल्याचं त्याला वाटतं.

हेही वाचा: Urfi Javed: इच्छा पुर्ण...शेवटी उर्फीला बेड्या ठोकल्याचं!

त्यातच सरकारविषयी आणि त्यांच्या मराठी चित्रपटाला असलेल्या पाठिंब्याच्या धोरणाविषयी बोलून आता त्याला कंटाळा आला असल्याचं त्याने सांगितलं. कारण त्याच्यानुसार इथे भारतात विशेषतः महाराष्ट्रातच मराठी चित्रपटाविषयी कोणताही नियम नसेल, मल्टिप्लेक्समध्ये एक स्क्रिनही मराठीसाठी नसेल तर काही बोलून उपयोग नाही.

हेही वाचा: Bigg Boss 16: 'नुसतं नाटक..' सदस्य आता शालिन अन् टिनावर भडकलेच नाही तर केलं...

नेहमीच मराठी चित्रपटांना शोसाठी थिएटर दिले जात नाही अशी खंत अनेक मराठी कलाकार करत असतात.

पुढे सुबोध म्हणाला की त्याला माहितीये की मल्टिप्लेक्सवाले काही समाजसेवा करायला बसलेले नाहीयेत. त्यांनाही त्यांचा व्यवसाय करायचा आहे. पण जर स्पर्धा असेल तर ती नेहमीच बरोबरीची असते.

हिंदी चित्रपटाला १५ शो आणि मराठीला एक शो अशी स्पर्धा नसते. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी सरकारने काहीतरी करणे अपेक्षित असल्याचं त्याला वाटतं मात्र आता सतत बोलूनही त्याला कंटाळा आलाय. असं सुबोध म्हणाला.