Marathi Web Series- 'Secret of Gawaskar' Google
मनोरंजन

'सीक्रेट ऑफ गावस्कर', प्रत्येक ५ व्या मिनिटाला संभ्रमात टाकणारी Web Series

तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ऍक्शनचा भरणा असलेली वेबसिरीज लवकरच 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

प्रणाली मोरे

Marathi Web series 'Secret Of Gawaskar': ओटीटी हेच भविष्य आहे असे म्हणणाऱ्या सिनेविश्वात ओटीटीचा जाळ भलताच पसरला आहे. बरेचसे मालिका विश्वातील कलाकार ही ओटीटीविश्वात काम करण्यास सज्ज झाले आहेत. क्राईम, रोमान्स, ऍक्शन, वजनदार कथानक, आणि उत्कृष्ट कलाकार यांची सांगड घालत ओटीटी विश्वावर राज्य करण्यासाठी क्राईम आणि थ्रिलरचा कॉकटेल घेऊन 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही नवीकोरी वेबसिरीज तगड्या स्टारकास्टसह प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज होत आहे. 'चंद्रा फिल्म एंटरटेनमेंट' निर्मित आणि 'व्हीमास मराठी' प्रस्तुत दिग्दर्शक तेजस लोखंडे दिग्दर्शित ही क्राईम आणि ऍक्शनचा भरणा असलेली वेबसिरीज लवकरच 'व्हीमास मराठी' या प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.(Marathi Web Series- 'Secret of Gawaskar')

या आधी व्हीमास मराठीच्या 'राडा राडा' या टॉक शो मधून प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे झळकली त्यांच्या या टॉक शो ला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आता त्यांची 'सिक्रेट ऑफ गावस्कर' ही वेबसिरीज रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत आहे. नुकताच या वेबसिरीजचा भयावह ट्रेलर प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास सज्ज झाला आहे.

अभिनेता हरीश दुधाडे, संग्राम समेळ, मयूर पवार, रमेश चांदणे, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर, दीप्ती लेले, शिल्पा नवलकर, मीरा सारंग, सीमा कुलकर्णी, लतिका सावंत, राधा धरणे या तगड्या स्टारकास्टच्या दमदार भूमिका या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाची जादू या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव नक्कीच घेईल यांत शंकाच नाही. लेखक अजिंक्य ठाकूर लिखित ही वेबसिरीज असून याच्या संकलनाची बाजू प्राची पाठारे हिने उत्तमरीत्या साकारली आहे. तर क्राईम सीनला कॅमेऱ्यात कैद करण्याची जबाबदारी शिवराज सातार्डेकर याने पेलवली आहे.

या वेबसिरीजबद्दल बोलताना दिग्दर्शक तेजस लोखंडे असे म्हणाला की, 'सिक्रेट ऑफ गावस्कर' वेबसिरीज वेगळ्या पठडीतील असून प्रत्येक कलाकाराने केलेले काम हे वाखाणण्याजोगे आहे. या वेबसिरीज मध्ये काम केलेलं सर्वच कलाकार माझे मित्र आहेत. साऱ्या कलाकारांचा अभिनयाचा अनुभव दांडगा असल्याने साऱ्यांनीच वेबसिरीजमध्ये उत्तम काम केलं आहे. या वेबसिरीजची कथा प्रत्येक पाचव्या मिनिटाला आपल्याला संभ्रमात पाडतेय, त्यामुळे पुढे काय होतंय याची उत्सुकता आणखीनच ताणली जातेय

या वेबसिरीज मुळे आम्ही एक वेगळा जॉनर प्रेक्षकांसमोर आणला आहे तर माझे प्रेक्षकांना हेच आवाहन आहे की, प्रेक्षकांनी वेगळ्या जॉनरला साथ द्यावी, वेगळ्या धाटणीची ही वेबसिरीज नक्की पहा. सिक्रेट ऑफ गावस्करच सिक्रेट नेमकं काय असेल हे, तुम्हाला व्हीमास मराठी वर बघायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Accident: आईला घेण्यासाठी आलेल्या दोघांवर काळाचा घाला; खुलताबाद रस्त्यावर अज्ञात वाहनाची दुचाकीच्या धडक, दोन्ही मित्र ठार

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरणातून आज सकाळी ९,४३२ क्युसेक विसर्ग; गोदावरी खोऱ्यातील गावांना सतर्कतेचा इशारा

Nagpur Crime : महिलेला करायला लावली नग्न पूजा, व्हिडिओ बनवला अन्...नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड, 'असं' शोधायचा सावज

Neeraj Chopra: ऑलिंपिक पदकविजेता नीरज चोप्राची ब्रुसेल्स स्पर्धेतून माघार, पण अंतिम फेरीत दाखवणार आपला दम

Mahabaleshwar Rain Update; 'महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस'; भिलारमधील शाळेचा स्लॅब कोसळला, ग्रामस्थांची धावपळ

SCROLL FOR NEXT