nana patekar marathi movie ole aale teaser  SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: बाप कायम गंभीर! मात्र माझा... सिद्धार्थ सांगणार बाबाची कहाणी! 'ओले आले'चा भन्नाच टिझर बघाच

नाना पाटेकर - मकरंद अनासपुरे यांच्या कॉमेडीची जुगलबंदी बघायला मिळणार आहे

Devendra Jadhav

Nana Patekar: गेल्या काही दिवसांपासुन नाना पाटेकर चांगलेच चर्चेत आहेत. नाना पाटेकर यांनी आजवर मराठी - हिंदी अशा विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

नाना पाटेकर यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हा सिनेमा म्हणजे ओले - आले. नानांच्या ओले - आलेचा धम्माल टीझर रिलीज झालाय.

(nana patekar marathi movie ole aale teaser)

ओले - आलेचा धम्माल टीझर रिलीज

नाना पाटेकर यांच्या ओले - आलेचा धम्नाल टीझर रिलीज झालाय. या टीझरमध्ये सुरुवातीला पाठमोरे नाना पाटेकर योगा करताना दिसतात. मागे सिद्धार्थ चांदेकरचा आवाज दिसतो.

जनरली बाप कसा असतो. वक्तशीर सगळं कसं एकदम टाईम टू टाईम. कर्तव्यनिष्ठ म्हणजे रिस्पॉन्सिबल. जबाबदार - रुबाबदार. कायम खंबीर पण सतत गंभीर. पण माझा... असं म्हणताच नाना पाटेकर यांचा धम्माल अंदाज पाहायला मिळतो.

नाना नाचताना आणि आयुष्य मजेत जगताना दिसतात. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे यांचीही झलक पाहायला मिळतेय.

नाना आणि मकरंद यांचा नवीन सिनेमा ओले ओलेची घोषणा

एक अशा प्रवासाची गोष्ट, ज्याने शिकवले जीवन जगण्याचे सूत्र! 'ओले आले' असं कॅप्शन देत काही दिवसांपुर्वी नाना पाटेकरांच्या नवीन मराठी सिनेमाची घोषणा करण्यात आलीय.

विशेष गोष्ट म्हणजे हा सिनेमा लोकांना खळखळुन हसवणार यात काही शंका नाही. याशिवाय या सिनेमाच्या माध्यमातुन नाना पाटेकर अनेक वर्षांनी हलक्या फुलक्या विनोदी भुमिकेत दिसणार आहेत.

ओले ओले मध्ये कलाकार आणि सिनेमाची रिलीज डेट

ओले आले मध्ये नाना पाटेकर - मकरंद अनासपुरे यांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

याशिवाय या सिनेमात सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव सुद्धा खास भुमिकेत दिसणार आहेत.

ओले आले हा सिनेमा ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT