Nilesh Sabale apologizes to Chhatrapati Sambhaji Raje
Nilesh Sabale apologizes to Chhatrapati Sambhaji Raje 
मनोरंजन

...म्हणून निलेश साबळेंनी मागितली छत्रपती संभाजी राजे यांची माफी

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम नव्या वादाच्या भोवऱ्यात आहे.11 मार्च 2020 ला दाखविण्यात आलेला एपिसोडमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि सयाजी गायकवाड यांच्या प्रतिमांचा वापर चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचा आरोप छत्रपती संभाजी राजे यांनी केला आहे. त्यांच्या प्रतिमांऐवजी कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या छायचित्रांचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. याबाबत निलेश साबळे आणि संबधित वाहिनीला गैरकृत्याची जबाबदारी स्विकारून माफी मागा, अन्यथा कारवाईला समोरं जावं लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, निलेश साबळे यांनी झी मराठीच्या ट्विटर हॅडलवरुन व्हिडिओ पोस्ट करुन माफी मागितली आहे.

याबाबत, छत्रपती संभाजी राजे यांनी 'लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली,  की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे'' असे ट्विट करुन निषेध व्यक्त केला. तसेच, ''निलेश साबळे तसेच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा त्यांनी इशाराही दिला आहे.

''आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले. सयाजीराव गायकवाडांचे योगदान ही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची व पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत." असेही ते म्हणाले आहेत. 


याबाबत निलेश साबळे यांनी झी मराठीच्या ट्विटर हॅडलवरुन व्हिडिओ पोस्ट करुन माफी मागितली आहे. ते म्हणाले, ''या कार्यक्रमात कोणत्याही महापुरुषांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता. तो पुढेही कधीच नसेल. पण त्यामुळे वाद निर्माण झाला, गैरसमज निर्माण झाल्यामुळे मी समोर येऊन माफी मागत आहे. खंर तर छत्रपती शाहू महाराज असतील किंवा या देशातील सगळे महाराज असतील त्यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यामध्ये वापरलेला फोटो होता तो शाहू महाराजांचा नव्हता. पण तो ज्या महाराजांचा होता त्यांच्याही बद्दल दिलगिरी व्यक्त करतो आहोत. अगदीच तांत्रिक गोष्टीतून झालेली ती चूक होती. त्यामुळे आपली दिलगीरी व्यक्त करतो आणि आपली माफी मागतो. क्षमस्व.''

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT