Priya Bapat Instagram
मनोरंजन

Priya Bapat: 'मी कितीही आईवेडी असले तरीही..', वडीलांसाठी प्रिया बापटनं केलेली पोस्ट प्रत्येक मुलीला करेल भावूक

प्रिया बापटनं वडीलांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्तानं पोस्ट करत त्यांच्यासोबतच्या काही खास आठवणी अन् किस्से शेअर केले आहेत.

प्रणाली मोरे

Priya Bapat: मराठी इंडस्ट्रीतील काही चर्चेतल्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव नक्कीच घ्यावं लागेल. आता प्रिया केवळ तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळेच चर्चेत असते असं नाही बरं का.. प्रिया खरंच गुणी अभिनेत्री देखील आहे. ती काम मोजकंच करत असली तरी ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिल असं नक्कीच असतं.

नाटक,सिनेमा,ओटीटी यावर प्रिया सध्या व्यस्त दिसते. तिच्या 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तर चक्क तिसरा सिझन आपल्या भेटीस येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तिचा चाहता वर्ग या सीरिजच्या प्रतिक्षेत आहे.

असो..त्याविषयी बोलूच.. पण सध्या प्रियानं तिच्या वडीलांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्तानं केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. चला प्रिया नेमकं काय म्हणालीय वडीलांविषयी जाणून घेऊ या. (Priya Bapat Post for her father, celebrate fathers birthday)

प्रिया बापटनं वडीलांसाठीच्या त्या पोस्टमध्ये लिहिलंं आहे,''प्रिय बाबा, आज तुमचा ८१ वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा.

मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे''.  

''प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे "माझे बाबा". अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंग च्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A  Economics  केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा''. 

''खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा''.

''मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला "प्रिया" म्हटलत आणि "प्रिया शरद बापट" ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT