Priyanka Chopra-Jonas, Nick Jonas Google
मनोरंजन

प्रियंकाच्या मुलीला बाळकृष्णाची लागली गोडी; 'त्या' फोटोनं वेधलं लक्ष

सोशल मीडियावर प्रियंका चोप्राच्या 'त्या' फोटो पोस्टवर चाहते खूश झाले आहेत.

प्रणाली मोरे

सरोगसीच्या माध्यमातून आपण आपल्या पहिल्या बाळाला जन्म देत आहोत हे प्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra) सोशल मीडियावर पोस्ट केलं अनं तिच्यासोबतच तिचे सगळे चाहतेही त्या येणाऱ्या बाळाची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक झाले. आतापर्यंत तिनं आपल्या मुलीचे फोटो जरी कुठे पोस्ट केले नसले तरी तिनं तिच्या आणि निक जोनस(Nick Jonas) च्या फोटोसोबत सोशल मीडियावर मुलीच्या खेळण्याच्या रुमचे काही फोटो पोस्ट केले आहेत,ज्यातनं एक मोठं सरप्राईज सर्वांना मिळालं आहे. प्रियंका-निकच्या मुलीची अद्याप झलक दिसणार नसली तरी तिच्यासाठी सजवलेल्या खेळण्याच्या रुमची झलक मात्र डोळे दीपवून नक्की जाईल. 'आता बडे लोग,बडी बात, पण तरीही सेलिब्रिटींचं आयुष्य त्यांनी कितीही झाकुन ठेवलं तरी ते म्हणतात न खुली किताबसारखं असतं त्यांचं आयुष्य, ते काही खोटं नाही.

प्रियंका-नीकनं मुलीच्या जन्माची पोस्ट केल्यानंतर तब्बल दहा ते बारा दिवस सोशल मीडियापासून लांब राहणं पसंत केलं होतं. तसं प्रियंकानं आपल्या चाहत्यांना प्रेमाचं आवाहनच केलं होतं की. म्हणाली होती,''आम्हाला आमचं नवं आयुष्य एन्जॉय करायचंय,थोडीसी प्रायव्हसी हवी आहे वगैरे,वगैरे...'' त्यानंतर हे दोघे पुन्हा सक्रिय झाले सोशल मीडियावर अन् छान-छान फोटो पोस्ट करू लागले. आता प्रियंकानं नीक सोबतचे काही फोटो शेअर करताना मध्येच काही सरप्राईजिंग फोटो शेअर केलेयत जे आहेत तिच्या मुलीच्या खेळण्याच्या रुमचे.

खुप सारी खेळणी अशी छान मांडलेली त्या फोटोत दिसत आहे. तिथेच काही टेडीज मन आकर्षुन घेत आहेत. तर जवळच ठेवलेली बाळकृष्णाची सुंदर मुर्ती पाहून मन प्रसन्न होत आहे. आतापासूनच प्रियंका मुलीला बाळकृष्ण,भारतीय देव-देवता,परंपरा,संस्कृती यांचं मोल समजावून सांगत आहे असंच काहीसं त्या फोटोतील ती बाळकृष्णाची मूर्ती दर्शवत आहे. अभिनेत्रीनं हे फोटो पोस्ट करीत कॅप्शन दिलं आहे की,''फोटो डम्प''. आता हे प्रियंकानं पोस्ट केलेले फोटो तिच्या चाहत्यांसाठी मात्र ''वॉव'' क्षण ठरेल एवढं मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT