आयटम सॉंगवर नाचायला सुश्मिता सेन उतावीळ असायची यामागे होतं 'एक कारण' Sushmita Sen | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen

आयटम सॉंगवर नाचायला सुश्मिता सेन उतावीळ असायची यामागे होतं 'एक कारण'

भारताची मिस युनिव्हर्स बनल्यावर जितकं सुश्मिता सेननं(Sushmita Sen) नाव कमावलं तितकंच अभिनय क्षेत्रात आल्यावरही तिनं अनेक सिनेमात साकारलेल्या भूमिकांमधनं आपली दखल घ्यायला भाग पाडलं. नुकतंच एका मुलाखतीत तिनं स्पष्ट केलं की तिनं केलेल्या आयटम सॉंगचा तिला अभिमान आहे. आता खरं तर तिनं आपल्या करिअर मध्ये महत्त्वाची भूमिका सिनेमात करून, म्हणजेच मुख्य प्रवाहातली अभिनेत्री म्हणूनच नाव कमावलंय. पण तसं करतानाही तिनं ज्या काळात मुख्य प्रवाहातल्या अभिनेत्री आयटम नंबर करायच्या नाहीत त्या काळात त्या गाण्यांवर परफॉर्म करण्याचं धाडस केलंय. आणि याबद्दल तिच्या मनात कोणतीही खंत नाही किंवा ते दुय्यम दर्जाचं काम ती करायची असं तिला वाटत नाही.

सुश्मितानं म्हटलंय की,''माझ्याकडे आयटम सॉंगची ऑफर आली की मी टुणकन होकार कळवायचे''. सुश्मिता सेननं अनेक आयटम सॉंगवर डान्स केला आहे. यामध्ये 'मै कुडी अंजानी हॅूं' (जोर), 'मेहबूब मेरे' (फिझा),'दिलबर दिलबर' (सिर्फ तुम), 'शकालाका बेबी' (नायक) आणि 'शकिरा' (नो प्रॉब्लेम) अशा अनेक आयटम नंबरचा उल्लेख करता येईल. सुश्मितानं आतापर्यंत वेगवेगळ्या भाषेतील तब्बल ३० सिनेमांमधून काम केलं आहे.

हेही वाचा: शूटिंग करताना अमिताभ बच्चननी का फोडला कॅमेरा?

सुश्मितानं तिच्या मुलाखतीत म्हटलं आहे,''मी आयटम नंबरसाठी उत्सुक दिसले की माझे मॅनेजर मला म्हणायचे,आयटम नंबर? मेन लीडसाठी काम करणारा अभिनेता-अभिनेत्री आयटम नंबर करत नाही. तुम्हाला दुय्यम दर्जा मिळू शकतो. पण मी त्यांचे ऐकायचे नाही. मी म्हणायचे, ''नाही मला करायचंय'' . माझ्या या निर्णयाला कंटाळून माझे दोन मॅनेजर्स मला सोडून गेले. ते म्हणायचे,'सुस्मिता विचित्र आहे. आयटम नंबरला होकार कळवते. आणि आम्ही हिला चांगल्या सिनेमात भूमिका मिळावी म्हणून प्रयत्न करतोय. आम्ही इंड्स्ट्रीत इतकी वर्ष काम करतोय,आम्हाला माहित आहे काय करायला हवं,आणि काय नाही. आणि ही २२ वर्षांची मुलगी काहीही निर्णय घेतेय'. पण मला नेहमीच वाटत आलंय सिनेमा आपटला, तरी त्याचं संगीत जर उत्तम असेल तर त्यातील एकही गाणं तुमच्या करिअरला उभारी द्यायला पुरेस ठरतं. हा माझा अनुभव आहे''.

Sushmita Sen

Sushmita Sen

सुश्मिताची काही दिवसांपूर्वीच ओटीटी वर प्रदर्शित झालेली 'आर्या २' लोकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. यातील सुस्मितानं साकारलेल्या 'आर्या सरीन' या कुटुंबासाठी-आपल्या मुलांच्या रक्षणासाठी वाईट जगाशी संघर्ष करणाऱ्या स्त्रीची-आईची भूमिका प्रेक्षकांना आवडली आहे. डिस्ने हॉट स्टारवर ही वेबसिरीज आपल्या भेटीस आलीय. या सिरीजमध्ये सिकंदर खेर,विकास कुमार,अंकुर भाटिया,आकाश खुराना,डेलनाझ ईरानी असे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: Sushmita Sen Love To Dance On Item Number In Filmreson Behind

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top