Raj Thackeray
Raj Thackeray  esakal
मनोरंजन

Raj Thackeray: 'सिनेमॅटिक लिबर्टी घ्यावीच लागते, फक्त...' राज यांची रोखठोक भूमिका

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackery comment on historical movies: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध इतिहासकार आणि अभ्यासक जयसिंगराव पवार यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासोबत काही महत्वाच्या मुद्द्यांवर राज यांची चर्चा झाली. ऐतिहासिक चित्रपट आणि त्यावरील वाद यावर परखडपणे भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमधून ऐतिहासिक चित्रपटांवरुन जो वाद निर्माण होतो आहे त्यावर भाष्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात वीर मराठे दौडले सात यावरुन वेगवेगळ्या प्रकारचे वाद समोर आले होते. वेडात मराठे वीर दौडले सात, दिग्दर्शकानं त्या सात जणांची नावं दिली. त्यावरुन वाद सुरु झाला. राज म्हणाले, इतिहासाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळे त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी मी इतिहासकारांशी बोलतो, चर्चा करतो. यासंबंधी मी गजानन मेहंदळे यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा ते म्हणाले, जगातल्या कोणत्याही इतिहासाच्या पानात ते वीर मराठे सात, आठ होते की आणखी किती होते याविषयी कोणताही दाखला नाही. आतापर्यत आपण जी नावं ऐकली ती काल्पनिक आहेत. प्रतापराव गुजरांसोबत कोणकोण होते याविषयी देखील काहीही उल्लेख नाही.

हेही वाचा - भारतीय उत्पादनांच्या खरेदीतली वाढ बनवेल देशाला आर्थिक महासत्ता...

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रताप गुजरांना पत्र पाठवले होते त्याविषयी देखील काही माहिती नाही. आजपर्यत हे पत्र सापडलेले नाही. ते पत्र फक्त पाठवले असा उल्लेख आहे. यावर जयसिंगराव पवारही म्हणाले की, ते खरं आहे इतिहासामध्ये कागदोपत्री कोणताही संदर्भ नाही, दाखलाही नाही, ती पोवाडे आणि वेगवेगळया कथांच्या माध्यमातून उभ्या केलेल्या व्यक्तिरेखा आहेत. महाराजांच्या काळातील ग्रंथ म्हणजे शिवभारत आहे.

इतिहास नुसता सांगायचा म्हटला तर रुक्ष आहे. त्यामुळे तो आणखी वेगवेगळ्या प्रकारची माहिती टाकली जाते. ऐतिहासिक चित्रपटांमध्ये लिबर्टी घेतल्याशिवाय चित्रपट तयार करता येत नाही. तो इतिहास सांगू शकत नाही. फक्त इतिहासाला धक्का लागू न देण्याची काळजी घेण्याची गरज आहे. असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT