Rani Mukerji latest news esakal
मनोरंजन

Rani Mukerji : राणी मुखर्जीला 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!

प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जीच्या बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Rani Mukerji bollywood Actress : प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ राणीनं तिच्या अभिनयाची वेगळी छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटविल्याचे दिसून आले आहे. आता तिच्याविषयीची एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

राणीला मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे मधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. समीक्षकांची मोठी पसंती राणीच्या नावाला मिळाल्याचे दिसून आले. त्या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळेच की काय तिच्या नावाभोवतीचं ग्लॅमर अद्यापही कायम आहे. बॉलिवूडची आयकॉन राणी मुखर्जी हिला नुकत्याच झालेल्या झी सिने अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले आहे.

मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे या चित्रपटामध्ये साकारलेली भूमिका ही तिच्या आजवरच्या इतर काही भूमिकांपैकी एक आहे. असे म्हटले होते. यापूर्वी राणीच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली आहे. ब्लॅक, कभी खुशी कभी गम, मर्दानी, गुलाम सारख्या चित्रपटांतील तिच्या भूमिका विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी एका आईचा संघर्ष खूप काही सांगून जाणारा आहे. त्यात राणीनं उभी केलेली ती व्यक्तिरेखा जबरदस्त आहे.

राणीचा मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होता. त्याच्यावर नेटकऱ्यांनी देखील दिलेल्या प्रतिक्रिया भन्नाट होत्या. आता या चित्रपटासाठी राणीला गौरविण्यात येणं हा तिच्या चाहत्यांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांनी तिला शुभेच्छा देत तिचे कौतुकही केले आहे.

पुरस्कार मिळाल्यावर राणी म्हणाली, “हा पुरस्कार माझ्यासाठी खूप खास आहे. हे माझे इंडस्ट्रीतील 27 वे वर्ष आहे आणि माझ्या कामाचा गौरव आणि सन्मान होत आहे हे पाहून आनंद वाटतो. मिसेस चॅटर्जी हा चित्रपट खूप खास आहे कारण तो एका आईची आणि तिच्या ताकदीची कथा आहे. कारण ही प्रत्येक भारतीय स्त्रीची, प्रत्येक आईची कथा आहे. मी विशेषतः माझ्या दिग्दर्शिका आशिमा छिब्बरचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला या चित्रपटात संधी दिली.

यावेळी मला माझे निर्माते, सहकारी कलाकार यांचे देखील आभार मानायचे आहे. अशा आशयाचे चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत नसताना, अशा वेळी माझ्या पाठीशी उभे राहून या चित्रपटाला पाठिंबा दिल्याबद्दल मी निर्माते झी स्टुडिओ - शारिक, भूमिका आणि एम्मा एंटरटेनमेंट - निखिल, मधु, मोनिशा यांची आभारी आहे.

2023 हे चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाचे वर्ष ठरले आहे कारण MCVN सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रचंड आदर आणि प्रेम मिळाले आहे. या चित्रपटानं खूप काही वेगळ्या गोष्टी नव्यानं शिकायला मिळाल्या. त्याचाही फायदा होतो आहे. अशा शब्दांत राणीनं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaysingpur Heavy Rain : जयसिंगपुरात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार; घरांमध्ये पाणी, कोल्हापूर-सांगली महामार्गावर फूटभर पाणी

Manchar News : वादळी वाऱ्यामुळे केळी, मका व आंबा पिकांचे मोठे नुकसान; प्रशासनाला पंचनामे करण्याच्या दिलीप वळसे पाटील यांच्या सूचना

MP Supriya Sule : ‘नरेटिव्ह’ पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई का नाही?

अमरावतीत ट्विस्ट! महायुतीत बंडखोरी करणाऱ्या उमेदवाराचा अर्ज फेटाळला, आता रिंगणात चार उमेदवार, नेमकं काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावाकडे शासनाचे दुर्लक्ष; स्मारकासाठी मंजूर केलेला दोन कोटींचा निधी गेला कुठं?

SCROLL FOR NEXT