Oscar Winner 2024 : अखेर 'ओपनहायमर'नं कोरलं 'ऑस्कर'वर नाव! 13 नॉमिनेशन, 7 पुरस्कारांवर उमटवली मोहोर

ऑस्कर २०२४ द बेस्ट मुव्ही अँड ऑस्कर गोज टू...अन् नोलानच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आल्याचे दिसून आले.
Oppenheimer Best Movie Oscar 2024
Oppenheimer Best Movie Oscar 2024 esakal

Oscar Winner 2024 Best Movie Oppenheimer : प्रसिद्ध दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलनच्या ओपनहायमर या चित्रपटानं सर्वोकृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळवून आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन या चित्रपटाला ऑस्कर मिळण्याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते. यंदाच्या ९६ व्या ऑस्कर सोहळ्यात नोलानच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

नोलनच्या ओपनहायमरला १३ नामांकन मिळाली होती. यावेळी त्याच्याच ओपनहायमरचा प्रभाव दिसून आला. ऑस्कर २०२४ द बेस्ट मुव्ही अँड ऑस्कर गोज टू...अन् नोलनच्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आणि चाहत्यांच्या आनंदाला उधाण आल्याचे दिसून आले. ओपनहायमला पूअर थिंग्ज अन् मास्टर्रो तसेच किलर्स ऑफ द फ्लॉवर मून चित्रपटांशी स्पर्धा होती.

नोलनच्या ओपनहायरमनं यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात कमाल केली आहे. ओपनहायरमला बेस्ट पिक्चर्स, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट अॅक्टर, बेस्ट सर्पोटिंग अॅक्टर, बेस्ट फिल्म एडिटिंग, बेस्ट ओरिजनल स्कोअर आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी यासाठी मानाचे ऑस्कर मिळाले आहे. १३ पैकी या चित्रपटानं ७ पुरस्कारांवर आपल्या नावाची मोहोर उमटविल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी ऑस्कर सोहळ्यात मार्टिनी स्कोर्सेसी आणि नोलन यांच्यात जबरदस्त टक्कर असल्याचे सांगण्यात येत होते.

Oppenheimer Best Movie Oscar 2024
Oppenheimer Review : अमेरिका जशी डोक्यावर घेते तशीच ती...! 'ओपनहायमर'ला बोटावर नाचवलं

जगभरामध्ये नोलनच्या ओपनहायमरनं प्रभावी कामगिरी केली होती. त्यावरुन काही अंशी वादही झाला होता. भारतामध्ये देखील या चित्रपटानं मोठी कमाई करत प्रेक्षकांची दाद मिळवली होती. नोलनच्या यापूर्वीच्या काही चित्रपटांना देखील ऑस्करचं नामांकन मिळालं होतं. मात्र ओपनहायमरनं इतिहास घडवत नोलनला प्रख्यात दिग्दर्शकांच्या यादीत बसवलं आहे.

आपल्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी नोलन ओळखला जातो. त्याचे चित्रपट समजून घेण्यासाठी प्रेक्षकांना देखील तितकीच तयारी करावी लागते असे म्हटले जाते. ओपनहायमरच्या माध्यमातून त्यानं अणुबॉम्बचा शोध, त्याचा केला जाणारा वापर, त्याचे जागतिक राजकारणावर झालेले परिणाम, अमेरिकेचं धोरण आणि या सगळ्याचा मानवतेशी असलेला संबंध यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाल्याचे दिसून आले.

Oppenheimer Best Movie Oscar 2024
Oscars 2024: ... अन् ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात चक्क नग्न अवस्थेत स्टेजवर आला जॉन सीना; व्हिडीओ होतोय व्हायरल

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com