Rashmika Mandana Google
मनोरंजन

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना झाली पक्की मुंबईकर;पहा नवीन घराचे फोटो

गेल्यावर्षी तिनं मुंबईत घर घेतल्याची बातमी होती;नवीन वर्षात अभिनेत्रीनं गृहप्रवेश केला आहे.

प्रणाली मोरे

रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिनं दाक्षिणात्य सिनेसृष्टीपासून अभिनयाला सुरुवात केली असली तरी आता लवकरच ती बॉलीवूडकर होणार आहे. तिचे 'मिशन मजनू' आणि 'गूडबाय' हे दोन सिनेमे आपल्या भेटीस येणार आहे. रश्मिकानं अगदी लहान वयात तिच्या अभिनयानं,तिच्या नृत्य कलागुणांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. केवळ दक्षिणेत नाही तर हिंदी सिनेप्रेमी देखील रश्मिकाच्या दाक्षिणात्य सिनेमांचे फॅन आहेत. केवळ तिला पाहण्यासाठी तिचे सिनेमे पाहिले जातात. तिच्या सौंदर्यांन आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सनीच माणूस तिच्याकडे आकर्षित होतो,याचा अनुभव आलाच असेल अनेकांना. उगाच नाही काही तिला 'नॅशनल क्रश' किंवा 'एक्सप्रेशन क्वीन' म्हटलं जातं.

रश्मिका आता बॉलीवूड सिनेमांत काम करीत आहे त्यामुळे अनेकदा तिचं मुंबईत येणं-जाणं होतं. तिला नेहमीच मुंबई विमानतळावर स्पॉट केलं जायचं. पण आता तिचं मुंबई विमानतळावर फार ये-जा करताना दिसणं बंद होणार आहे. ती शुटिंगसाठी मुंबईत यायची,शुटिंग दरम्यान हॉटेलवर थांबायची आणि मग परत आपल्या घरी कर्नाटकला निघायची. पण आता तिनं ही नेहमीची ये-जा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तिनं खरंतर गेल्या वर्षीच मुंबईत घर खरेदी केलं होतं. पण ती तिथे राहण्यास गेली नव्हती कारण घराच्या इंटेरिअरचं काम सुरू होतं. पण आता कळतंय की नुकतीच ती तिच्या मुंबईतील नवीन घरात शिफ्ट झाली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर मुंबईतील त्या घराचे फोटो पोस्ट केले आहेत. आता मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतल्यावर तिचा प्रवास थोडा कमीच होणार नाही का. म्हणजे ती मुंबई विमानतळावर कशी बरं फार वेळा दिसेल.

रश्मिका मंदाना हिचा 'पुष्पा' हा सिनेमा चांगलाच गाजला. या सिनेमानं जवळजवळ ३०० कोटींची कमाई केली आहे आतापर्यंत. या सिनेमात तिच्यासोबत साऊथ सुपरस्टार अल्लु अर्जुन (Allu Arjun)मुख्य भूमिकेत होता. या सिनेमातील रश्मिकाच्या 'सामी सामी' गाण्यानं सोशल मीडियावर व्हिडीओ रीलचा नुसता पाऊस पाडला होता. या सिनेमात रश्मिकानं साकारलेली 'श्रीवल्ली' ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT