Ravi Kishan Latest News Ravi Kishan Latest News
मनोरंजन

Ravi Kishan : अभिनेते, भाजप खासदार रवी किशन यांची फसवणूक; तक्रार दाखल

खासदार रवी किशन यांनी पोलिसांत तक्रार केली

सकाळ डिजिटल टीम

Ravi Kishan Latest News उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे खासदार व अभिनेते रवी किशन (Ravi Kishan) यांनी मुंबईतील व्यावसायिकाविरुद्ध ३.२५ कोटींची फसवणूक (Fraud) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती खासदार पवन दुबे यांनी दिली. याप्रकरणी त्यांनी कँट पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, रवी किशन (Ravi Kishan) यांनी २०१२ मध्ये पूर्व मुंबईतील रहिवासी जैन जितेंद्र रमेश नावाच्या व्यक्तीला ३.२५ कोटी दिले होते. पैसे परत करण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याला ३४ लाखांचे १२ धनादेश दिले. खासदार रवी किशन यांनी ७ डिसेंबर २०२१ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गोरखपूर शाखेत ३४ लाखांचे धनादेश जमा केले तेव्हा चेक बाऊन्स (Fraud) झाले.

सतत पैशांची मागणी करूनही व्यावसायिक पैसे परत करण्यास तयार होत नसल्याने खासदार रवी किशन यांनी पोलिसांत तक्रार केली. कँट पोलिस स्टेशनचे प्रभारी शशी भूषण राय यांनी सांगितले की, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पूर्वी खासदार कँट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंघारिया येथे राहत होते. अलीकडे ते तारांगण लेक व्ह्यू कॉलनीतील घरात राहू लागले आहेत. नुकतेच रवी किशन यांनी कौटुंबिक समस्येबद्दल ट्विट केले होते. त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचेही आजारपणामुळे निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

Yerawada Fire Station Darkness : येरवड्यातील अग्निशमाक केंद्र अंधारात; चार दिवसांपासून वीज पुरवठा बंद

SCROLL FOR NEXT