Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीने आर्यन खानला दिला सल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gauri Khan Latest News

Gauri Khan : ‘हव्या तितक्या मुलींना डेट कर, पण...’ सुहानानंतर गौरीचा आर्यनला सल्ला

Gauri Khan Latest News करण जोहरच्या (Aryan Khan) शोमध्ये गौरी खान (Gauri Khan) एक-दोन वर्षांनी नव्हे तर तब्बल १७ वर्षांनी भाग बनली. प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळीही तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. यापूर्वी मुलगी सुहाना खानला डेटिंगच्या बाबतीत सल्ला दिल्यानंतर गौरी खानने मुलाला सल्ला दिला आहे. होय, गौरी खानच्या या सल्ल्याचा सोशल मीडियावर बोलबाला आहे. तिचा सल्ला ऐकून चाहतेही हैराण झाले आहेत.

करण जोहरने (Karan Johar) गौरी खानला मुलीनंतर मुलगा आर्यन खानच्या डेटिंगबाबत सल्ला देण्यास सांगितले आहे. ‘तुला पाहिजे तितक्या मुलींना डेट कर; परंतु, लग्न करण्याचा निर्णय घेईपर्यंत. लग्न झाल्यावर डेटिंग नाही’ असा सल्ला गौरीने (Gauri Khan) आर्यन खानला दिला आहे.

हेही वाचा: Sukesh Chandrasekhar : निक्की, सोफियाने तिहार तुरुंगात सुकेशची घेतली दोनदा भेट

यानंतर करण जोहरने (Aryan Khan) गौरीला विचारले की, फॅशननेबल कोण आहे? यावर गौरी आर्यन खानचे नाव घेते. आर्यन हा फॅशनेबल असल्याचे ती म्हणते. त्याला शर्ट घालणे आवडत नाही. मला ज्या प्रकारे फुल स्लीव्हज घालणे आवडत नाही, त्यालाही अनेक गोष्टी आवडत नाहीत, असेही गौरी सांगते. यानंतर करण म्हणतो की मला त्याच्याशी बोलावे लागेल.

गौरी खानला तीन मुले आहेत. सुहाना, आर्यन आणि अबराम. तिघेही खूप लोकप्रिय आहेत. आर्यन खान चित्रपट निर्माता बनण्याच्या तयारीत असताना सुहाना खान झोया अख्तरच्या चित्रपटातून पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बोनी कपूर यांची धाकटी मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील या चित्रपटाचा भाग असणार आहे.

टॅग्स :Karan Johararyan khan