devoleena bhattacharjee  
मनोरंजन

'गोपी बहू'चा बोल्ड अंदाज; बेली डान्स व्हिडीओ व्हायरल

'गोपी बहू'चा वेगळा अंदाज काही चाहत्यांना पसंत पडला तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलंय.

स्वाती वेमूल

'साथ निभाना साथियाँ' saath nibhana saathiya या मालिकेत 'गोपी बहू'ची भूमिका साकारून अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी Devoleena Bhattacharjee प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. मालिका संपल्यानंतरही देवोलिना विविध कारणांमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. आता देवोलिनाचा बेली डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफार व्हायरल होत आहे. मालिकेत साध्या, सोज्वळ 'गोपी बहू'ची भूमिका साकारलेल्या देवोलिनाचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेसुद्धा थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत ८० हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. (saath nibhana saathiya fame devoleena bhattacharjee aka gopi bahu belly dance video viral)

या व्हिडीओत तिने एका इंग्रजी गाण्यावर बेली डान्स केला आहे. 'प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. मी या डान्स प्रकाराच्या प्रेमात पडलेय. पूर्ण डान्सचा व्हिडीओ पोस्ट करण्याइतपत मी अजून शिकले नाही. मात्र हा डान्स प्रकार मी सध्या शिकतेय', असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय. 'मला विश्वास आहे की मी हा डान्स प्रकार लवकरच शिकेन आणि डान्सचा पूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करेन', असंही तिने म्हटलंय. 'गोपी बहू'चा वेगळा अंदाज काही चाहत्यांना पसंत पडला आहे तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलंय.

देवोलिनाने भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकाराचं प्रशिक्षण घेतलं आहे. २०१९ मध्ये ती 'बिग बॉस १३'मध्ये झळकली होती. 'साथ निभाना साथियाँ' या मालिकेच्या दुसऱ्या सिझनच्या प्रमोशनदरम्यानही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी देवोलिना ही ज्वेलरी डिझाइनरची नोकरी करत होती. तिने 'डान्स इंडिया डान्स २' या रिअॅलिटी शोसाठी ऑडिशनसुद्धा दिलं होतं. मात्र २०१२ मध्ये तिने 'गोपी बहू'ची भूमिका साकारली आणि तिथून तिला तुफान प्रसिद्धी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT