Saif Ali Khan Kareena Kapoor Reunite for a project after 12 years
Saif Ali Khan Kareena Kapoor Reunite for a project after 12 years esakal
मनोरंजन

Saif-Kareena New Show : तब्बल १२ वर्षानंतर सैफ अन् करिना दिसणार एकत्र! कपलनं दिले नव्या शो चे संकेत

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Saif Ali Khan Kareena Kapoor Reunite for a project after 12 years : बॉलीवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी जोडी करिना कपूर आणि सैफ अली खान हे आता तब्बल १२ वर्षानंतर एकत्र दिसणार आहेत. त्यांनी २०१२ मध्ये एजंट विनोदमध्ये एकत्र काम केले होते. त्यानंतर ते पुन्हा त्यांनी एकत्रित स्क्रीन शेयर केली होती. त्यांच्या आगामी प्रोजेक्ट विषयी ऐकून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

नुकतीच सैफविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली होती. त्यात सैफच्या खांद्याला अन् गुडघ्याला फ्रॅक्चर झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. त्याच्या फ्रॅक्चर झालेल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

सैफला आता रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याची चर्चा आहे. दुसरीकडे त्याचा आणि करिनाचा प्रोजेक्ट चाहत्यांसमोर येतो आहे. टाटा प्ले च्या शओ नाऊ बिजिंग नावाची मालिका लवकरच व्हायरल होणार आहे. २४ जानेवारी रोजी त्याचे प्रसारण होणार आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

करिना आणि सैफनं यापूर्वी टशन, कुर्बान आणि एजंट विनोद नावाच्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्याला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.त्या चित्रपटांच्या निमित्तानं सैफ अन् करिनाची लव स्टोरी सुरु झाल्याचे म्हटले जाते. तसेच रोडसाईड रोमिओसाठी या दोन्ही सेलिब्रेटींनी आवाजही दिला होता. सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी आपण एका शोमधून एकत्रित काम करणार असल्याचे संकेत दिले आहे. अमर उजालानं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

एका मुलाखतीतून करिनानं सांगितलं की, पहिल्यांदा असं म्हटलं जात होतं की, हा माझ्यासोबत काम करेल की नाही, आमच्या एकत्रित काम करण्यावर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप घेण्यात आले होते. त्यावरुन आम्हाला ट्रोल देखील करण्यात आले होते. पण मला एक म्हणायचे आहे की, फिल्म जर चांगली असेल तर ती लोकांनी ती आवडतेच.

सैफनं म्हटले आहे की, आम्ही दोघेही ड्रामाच्या विरोधात आहोत. त्यामुळेच की काय एखाद्या वास्तव घटनेवर आधारित शो करता येईल का याचा विचार करतो आहोत. त्याचे प्रसारण आता होणार आहे. त्यासाठी आम्ही दोघेही कमालीचे उत्सुक आहोत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT