Sajini Shinde Ka Viral Video Trailer
Sajini Shinde Ka Viral Video Trailer  esakal
मनोरंजन

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : 'महिला कार्ड' म्हणजे 'आधार कार्ड' नाही जे सगळीकडे...! का केली 'सजनी'नं आत्महत्या?

युगंधर ताजणे

Sajini Shinde Ka Viral Video Trailer : चित्रपट मनोरंजन विश्वात आणखी एका चित्रपटाच्या ट्रेलरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या चित्रपटाचे नावच हा चर्चेचा विषय आहे. सजनी शिंदे का व्हिडिओ व्हायरल असे त्याचे नाव असून तो ट्रेलर सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे.

ज्यांनी इरफान खानचा लंच बॉक्स पाहिला असेल त्यांना निम्रत कौर कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या चित्रपटानं निम्रतला मोठी ओळख मिळवून दिली होती. त्यानंतर तिनं अभिषेक बच्चन सोबत दसवी फेलमध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली होती. यानंतर आता ती सजनी शिंदे का व्हिडिओ व्हायरल मध्ये दिसणार आहे.

Also Read - Financial Planning: कसे सुधारायचे आपले आर्थिक आरोग्य....

राधिका मदानची देखील या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका आहे. क्राईम, थ्रिलर, सस्पेन्सनं भरपूर असणाऱ्या सजनी शिंदेच्या ट्रेलरवर चाहत्यांनी केलेल्या कमेंट्स भन्नाट आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा विषय ट्रेडिंग असल्याचे दिसून आले आहे. त्याची चर्चाही आहे. या सगळ्यात प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेच्या भूमिकेनं चाहत्यांची मनं जिंकली आहे. सुबोध पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत दिसतो आहे.

स्त्री, बदलापूर सारख्या चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या दिनेश विजान यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ ही एका शिक्षिकेच्या आत्महत्येची कथा असून त्यात सजनी शिंदेची भूमिका राधिका मदान नावाच्या अभिनेत्रीनं केली आहे. त्यात मुख्य ट्विस्ट असा आहे की, सजनीच्या सुसाईड नोटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो. यानंतर जे घडतं ते किती भयानक आहे हे या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

निम्रतनं या चित्रपटामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या सगळ्यात सुबोध भावेच्या लूक आणि अभियनानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे कौतुक होत आहे. याशिवाय सुमित व्यास, भाग्यश्री, सोहम मुजूमदार यांच्याही या चित्रपटामध्ये भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election Results 2024: "हा फक्त ट्रेलर...!" PM मोदी वाराणसीमध्ये ५ हजार मतांनी पिछाडीवर; जयराम रमेश यांचा गर्भित इशारा

India Lok Sabha Election Results Live : जादू काही सेंकदाची! भाजपला मोठा धक्का तर इंडिया इतक्या जागीवर आघाडीवर

Lok sabha nivadnuk nikal 2024 : काँग्रेसला अच्छे दिन! तब्बल दहा वर्षांनी काँग्रेस तीन आकड्यांवर; इंडिया आघाडी अनपेक्षित यशाकडे

Lok Sabha Election Result: 400 पारचा नारा स्वप्नच? NDA च्या जागा होतायत कमी, इंडिया आघाडीची जोरदार टक्कर

Maharashtra Lok Sabha Election Results Live : साताऱ्यातून शशिकांत शिंदे 2643 मतांनी आघाडीवर

SCROLL FOR NEXT