panghrun movie
panghrun movie Sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : पांघरूण : मानवी भावभावनांचे अनोखे बंध

संतोष भिंगार्डे

मानवी नात्यांची अनोखी गुंफण, मनामध्ये असलेली आंतरिक ओढ, त्यातच प्रेमाची हळूवार अशी फुंकर, नात्या-नात्यांमधील विविध पदर आणि विविध भावभावनांचे मिश्रण म्हणजे पांघरूण हा चित्रपट.

मानवी नात्यांची अनोखी गुंफण, मनामध्ये असलेली आंतरिक ओढ, त्यातच प्रेमाची हळूवार अशी फुंकर, नात्या-नात्यांमधील विविध पदर आणि विविध भावभावनांचे मिश्रण म्हणजे पांघरूण हा चित्रपट. दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज यांनी आणलेला हा चित्रपट खिळवून ठेवणारा, मनाला आंतरिक समाधान देणारा असाच आहे. ही कथा प्रामुख्याने लक्ष्मी आणि अंतू गुरुजी या दोन पात्रांभोवती फिरणारी आहे. ज्येष्ठ लेखक बा. भ. बोरकर यांच्या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. पन्नासच्या दशकातील काळ, कोकणातील नयनरम्य सौंदर्य आणि कान तृप्त करणारे संगीत या चित्रपटात आहे.

चित्रपटाची कथा आहे लक्ष्मीची (गौरी इंगवले), ती नृत्यकलेत चांगलीच पारंगत असते. ऐन तारुण्यातच ती विधवा झालेली असते. तिचे लग्न अंतू गुरुजी (अमोल बावडेकर) यांच्याशी करून दिले जाते. अंतू अत्यंत हुशार व विद्वान असे कीर्तनकार असतात. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली असतात. मुली वयाने लहान असल्यामुळे गावातील मंडळींच्या आग्रहास्तव ते लक्ष्मीशी विवाह करतात, मात्र ते पहिल्या पत्नीच्या आठवणीतच अधिक रमलेले असतात. लक्ष्मी या दोन्ही मुलींचा चांगला सांभाळ करते. मात्र, दोघांचे मन आणि शरीर एकत्र येत नसते. त्यातच माधव (रोहित फाळके) हा गुरुजींचा शिष्य लक्ष्मीला पाहताच तिच्याकडे आकर्षित होतो. लक्ष्मी मात्र आपल्या संसारात रमलेली असते आणि आपल्या पतीकडून तिला काहीही अपेक्षा असतात. त्यानंतर कोणत्या घडामोडी घडतात हे चित्रपटात पाहणे उचित ठरेल. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक उत्तम आणि वेगळी कलाकृती दिली आहे.

कलाकारांची योग्य निवड व कोकणातील अप्रतिम, डोळ्यांना भुरळ घालतील अशी लोकेशन्स आणि कथेला साजेसे किंबहुना आपल्या मनाला आणि कानांना आनंद देईल असे सुमधुर संगीत या चित्रपटात आहे. अमोल बावडेकर आणि गौरी इंगवलेने या दोन्ही कलाकारांनी भूमिकेतील विविध पदर पडद्यावर सुरेख उलगडून दाखवले आहेत. शांत व संयमी अंतू गुरुजींच्या भूमिकेत अमोल कमालीचा भाव खाऊन गेला आहे. आणि लक्ष्मीची व्यक्तिरेखेतील भावभावनांचे विविध पैलू गौरीने छान रेखाटले आहेत. रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुलेखा तळवलकर, प्रवीण तरडे आदी कलाकारांची त्यांना चांगली साथ लाभलेली आहे. सिनेमॅटोग्राफर करण रावत यांनी कोकणातील निसर्गरम्य ठिकाणे कॅमेऱ्यात सुरेख बंदिस्त केली आहेत. काही अपवाद वगळता हा चित्रपट मनाला भुरळ घालणारा आणि खिळवून ठेवणारा आहे.

उत्तम कथा-पटकथा, कलाकारांचा खणखणीत अभिनय, त्याला साजेसे सुंदर संगीत, डोळ्यांना सुखावणारी लोकेशन्स आणि त्यावर गणेश मतकरी यांच्या संवेदनशील संवादांची फोडणी अशा सगळ्या बाबी छान जुळून आल्या आहेत. मानवी भावभावनांचे अनोखे बंध एका वेगळ्या प्रेमकथेतून उत्तमपणे उलगडण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमित शाहांच्या पंतप्रधानपदाची तारीख सांगितली पण मालीवाल यांचा प्रश्न आल्यावर मात्र... केजरीवालांच्या मदतीला धावले अखिलेश

SRH vs GT : हैदराबादला प्ले-ऑफचे तिकीट की गुजरात शेवटच्या लढतीत घालणार विजयाला गवसणी... कोण पडणार कोणावर भारी?

Sharad Pawar: बारामतीच्या मतदानानंतर अजित पवार प्रचारातून गायब? शरद पवारांनी व्यक्त केली काळजी

Latest Marathi News Live Update : मुंबई- अहमदाबाद मार्गावर मोठी वाहतूक कोंडी

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

SCROLL FOR NEXT