Shark Tank Ashneer Grover wife Madhuri Jain
Shark Tank Ashneer Grover wife Madhuri Jain esakal
मनोरंजन

Shark Tank : ...म्हणून अ‍ॅबॉर्शनही करावं लागलं! शार्क टँकच्या अशनीर ग्रोव्हरच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

सकाळ डिजिटल टीम

Shark Tank Ashneer Grover wife Madhuri Jain Interview : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये गेल्या काही रियॅलिटी शो नं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामध्ये आवर्जुन ज्या शो चा उल्लेख करावा त्यात शार्क टँकचे नाव घ्यावे लागेल. या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

अशनीर ग्रोव्हर हा शार्क टँकचा लोकप्रिय जज. त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या गोष्टी या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. प्रसिद्ध उद्योगपती म्हणून अशनीरचे नाव घ्यावे लागेल. सोशल मीडियावर सध्या अशनीरची पत्नी माधुरी जैन यांनी अभिनेत्री अमृता राव आणि आर.जे.अनमोल यांच्या शो कपल ऑफ थिंग्जची चर्चा रंगली आहे.

माधुरी यांनी त्या पॉडकास्टमधून दिलखुलासपणे उत्तर दिली. त्या म्हणाल्या, सोळा वर्षांपूर्वी आम्ही दिल्लीमधून मुंबईमध्ये शिफ्ट झालो. आम्ही जेव्हा मुंबईमध्ये आलो तेव्हा आमच्याकडे साधा टेबलही नव्हता. आम्ही जमिनीवर बसून जेवण करायचो. एक महिन्याचा पगार आल्यानंतर पहिल्यांदा फर्निचर खरेदी केले. त्यानंतर अशनीरनं लकी ड्रॉमध्ये बाईक जिंकली. सोळा हजार रुपये आम्हाला तेव्हा घर भाडे होते. घरात एकच बाथरुम, मोठ्या कष्टाचे आणि अडचणीचे ते दिवस होते. अशी आठवण माधूरीनं यावेळी सांगितली.

अशनीर आणि माधुरीनं व्हायरल झालेल्या त्या पॉडकास्टमध्ये आणखी एक धक्कादायक खुलासा केला होता. माधुरी यांनी सांगितलं की, मला पहिल्या प्रेग्नंसीच्यावेळी खूप अडचणी आल्या होत्या. त्यामुळे गर्भपात करावा लागला होता. ते माझ्यासाठी खूपच धक्कादायक होते. डॉक्टरांनी सांगितले होते की, मला गर्भपात हा करावाच लागणार आहे. त्यात काही कॉम्प्लिकेशन्स आले होते. अर्शनीर आणि मी आम्ही दोघेही बाळाच्या स्वागतासाठी तयार होतो. पण ती वेळ खूपच वेदनादायी होती.

अशनीरनं सांगितलं की, मला बायकोची थोडी भीती वाटायची. आमची पहिली भेट दिल्लीतील एका कोचिंग क्लासमध्ये झाली होती. अशनीर आणि माधुरीच्या लग्नाला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना दोन मुलंही आहेत. अशनीर विषयी सांगायचे झाल्यास तो शार्क टँकच्या पहिल्या सीझनमध्ये दिसला होता. त्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये त्याची जागा अमित जैन यांनी घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT