Shubhvivah new serial on star pravah cast kunjika kalwint mrunal deshpande yashoman apte sakal
मनोरंजन

Shubhvivah: बहिणीसाठी केलं वेड्या मुलाशी लग्न.. कुंजिका, यशोमान,मृणाल घेऊन येतायत नवी मालिका

स्टार प्रवाह वाहिनी ‘शुभविवाह’ ही नवी मालिका घेऊन आली आहे.

नीलेश अडसूळ

मनोरंजनाच्या प्रवाहात दर्जेदार मालिका सादर करत स्टार प्रवाह वाहिनीने रसिक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. सातत्याने नाविन्याची कास धरत निखळ मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीचा प्रयत्न असतो. नव्या वर्षात नव्या मालिकेची भेट प्रेक्षकांना देण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी सज्ज आहे. प्राईम टाईम मध्ये दाखवल्या जाणाऱ्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. यासोबतच प्रेक्षकांची दुपारही मनोरंजनाने परिपूर्ण करण्याचा स्टार प्रवाहचा प्रयत्न आहे. मुरांबा आणि लग्नाची बेडी या दोन मालिका पाहिल्याशिवाय प्रेक्षकांच्या दुपारच्या जेवणाची रंगत वाढत नाही. प्रेक्षकांची दुपार आता आणखी खास होणार आहे. कारण नव्या वर्षात म्हणजेच १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता सुरु होतेय नवी मालिका शुभविवाह. बहिणीच्या स्वप्नासाठी आपलं आयुष्य पणाला लावणाऱ्या भूमीच्या त्यागाची गोष्ट म्हणजे शुभविवाह ही मालिका. मधुरा देशपांडे, यशोमन आपटे, विशाखा सुभेदार, कुंजिका काळविंट, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ल, मनोज कोल्हटकर, विजय पटवर्धन अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘शुभविवाह ही नाते संबंध जपणारी कथा आहे. आयुष्य आपल्या समोर नेहमी एक आव्हान घेऊन उभं रहातं. ते आव्हान हसतमुखाने सामोरं जाणाऱ्या भूमी या मुलीची ही कथा आहे. विवाह बंधन हे शुभं असतं, एकमेकांच्या विश्वासाचं असतं. या मालिकेत हीच वचनं, हेच संबंध कसे टिकवून ठेवायचे हा प्रवास पहायला मिळेल. आयुष्य सुंदर आहे, ते तसं पहाता आलं पाहिजे हे सांगणारी मालिका आहे शुभविवाह.’

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अभिनेत्री मधुरा देशपांडे म्हणाली, ‘स्टार प्रवाह वाहिनीसोबत पुन्हा एकदा काम करताना अतिशय आनंद होत आहे. भूमी हे पात्र साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान आहे. कारण भूमीसारखी इतका पराकोटीचा त्याग करणारी व्यक्तिरेखा मी पहिल्यांदाच साकारते आहे. भूमीचे नवनवे पैलू मला दररोज उलगडत आहेत. आमची टीम खूप छान आहे. त्यामुळे शुभविवाहच्या निमित्ताने एक छान कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येईल.’

भूमीच्या सावत्र बहिणीची म्हणजेच पौर्णिमा ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री कुंजिका काळविंट म्हणाली, ‘मी गेले वर्षभर एका चांगल्या कथानकाच्या आणि चांगल्या पात्राच्या शोधात होते. शुभविवाह ही मालिका म्हणजे माझी स्वप्नपूर्ती म्हणता येईल. या मालिकेच्या निमित्ताने नव्या वर्षाची दमदार सुरुवात होणार आहे. पौर्णिमा या पात्राकडून खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. ही भूमिका साकारताना माझा कस लागतोय असं म्हण्टलं तरी वावगं ठरणार नाही. स्टार प्रवाहसोबत माझी पहिली मालिका आहे त्यामुळे खूपच उत्सुकता आहे. तेव्हा १६ जानेवारीपासून दुपारी २ वाजता पाहायला विसरु नका नवी मालिका शुभविवाह फक्त स्टार प्रवाहवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Train Track Video ‘’हा तर निव्वळ मूर्खपणा...’’ ; रेल्वे रूळावरील थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

Latest Maharashtra News Updates : अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात सेवा सप्ताह; अंबाबाई चरणी मुख्यमंत्रिपदाची प्रार्थना

Killedharur Crime : आईस्क्रीम खाणे पडले महागात; गाडीच्या डिक्कीतून ५० हजार रुपये लंपास

Georai Crime : शाळेतच दारू ढोसून विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारा गुरुजी अखेर वैद्यकीय तपासणीत आला पॉझिटिव्ह; तलवाडा पोलीस ठाण्यात एफआर दाखल

IND vs ENG 4th Test : वॉशिंग्टन सुंदरवर एवढाच विश्वास असेल तर...! R Ashwin ने चौथ्या कसोटीसाठी गौतम गंभीरला दिला सल्ला

SCROLL FOR NEXT