भारत-इंग्लंड चौथी कसोटी बुधवारपासून मँचेस्टर येथे खेळवली जाणार
यजमान इंग्लंडची पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी
टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवरून आऱ अश्विनचा सल्ला
India vs England 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना बुधवारपासून सुरू होत आहे. टीम इंडिया मालिकेत बरोबरी साधण्याच्या उद्देशाने मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड येथे उतरणार आहे. पण, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवरून सध्या बरीच चर्चा रंगली आहे. नितीश कुमार रेड्डीने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे, अर्शदीप सिंगला दुखापतीमुळे चौथ्या कसोटीत खेळता येणार नाही, रिषभ पंत पूर्णपणे बरा आहे की नाही, याची माहिती मिळालेली नाही. या संकटांवर मात करताना भारताला प्लेइंग इलेव्हन निवडायची आहे. त्यात भारताचा माजी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल यांना सल्ला दिला आहे.