Viral Train Track Video ‘’हा तर निव्वळ मूर्खपणा...’’ ; रेल्वे रूळावरील थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हीही असंच म्हणाल!

Viral video shows youth sleeping on railway track train passes over: क्षणीक प्रसिद्धीच्या हव्यासापोटी स्वत:चा जीव घातला धोक्यात, सोशल मीडियावर युजर्सनी चांगलंच सुनावलं!
A still from the viral video showing a young man lying on a railway track as a high-speed train passes over him, leaving viewers stunned.
A still from the viral video showing a young man lying on a railway track as a high-speed train passes over him, leaving viewers stunned. esakal
Updated on

Youth Sleeps on Railway Track Shocking Video Goes Viral: आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे असं आपण बोलतो.. कारण, कुठलीही लहान, मोठी घडली की ती आधी आपल्याला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते. शिवाय, कुणी काहीही केलं मग तो ते सोशल मीडियावर पोस्ट करतो, यामागे जास्तीत लोकांना आपल्याला पाहावं आणि आपण फेमस व्हावं, अशी त्याची इच्छा असते.

सध्या तर दरररोज युट्यूबर हजारो, लाखोजण वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करत असतात. ते व्हिडिओ कधी चांगले, कधी वाईट तर कधी भयानक, काळजाचा थरकाप उडवणारे असे सगळ्या प्रकारचे असतात. असाच एक भयानक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एक तरूण खरंतर त्याला सोशल मीडियावर बिनडोक, मूर्ख असंही बोललं जात आहे. होय, कारण त्याने तसंच कृत्यही केलं आहे. हे महाशय थेट रेल्वे रूळावर झोपले होते आणि त्यानंतर मग त्यांच्या अंगावरून भरधाव रेल्वे गेली. कळस म्हणजे या थरारक घटनेचा व्हिडिओ शूट करत्या यावा म्हणून त्याने स्वत: कॅमेरा ऑन करून मोबाइल देखील हातात ठेवलेला होता. त्यामुळे ही संपूर्ण थरारक घटना मोबाइल कॅमेऱ्यात शूट झाली आहे.

A still from the viral video showing a young man lying on a railway track as a high-speed train passes over him, leaving viewers stunned.
Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

भरधाव रेल्वे अंगावरून निघून गेल्यानंतर आपण मोठं शौर्य गाजवलं, या अविरभावात हे महाशय कॅमेरा स्वत:वर करून एक स्माईलही देतात. जणूकाही त्याला वाटत असतं की आपण काहीच चुकीचं केलं नाही.

A still from the viral video showing a young man lying on a railway track as a high-speed train passes over him, leaving viewers stunned.
Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, शिवाय विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. बहुतांश युजर्स त्या व्हिडिओतील तुरुणाला बिनडोक म्हणत आहेत. तर अनेकांनी असा मूर्खपणा कुणीही करू नये, असं आवाहनही केलं आहे. तर, क्षणीक प्रसिद्धीसाठी स्वत:चा जीव धोक्यात घालणं, हा कोणताही शहाणपणा नसतो, असंही एका युजरने म्हटलेलं आहे. ही घटना नेमकी कुठं घडली आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com