blind
blind 
मनोरंजन

'ब्लाईंड'मधील सोनमचा डँशिंग अंदाज पाहिलाय? फोटो व्हायरल

सकाळवृत्तसेवा

मुंबई : बॅालिवूड अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्स, अभिनय आणि बोल्ड वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. निरजा, रांझना, आयशा, प्रेम रतन धन पायो हे सोमनचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाले. 'ब्लाईंड' या नव्या चित्रपटत सोमन दिसणार आहे. या चित्रपटाचा क्लॅप बोर्ड हातात घेऊन सोनमने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.   

अंध पोलिस अधिकाऱ्याची गोष्टी 
कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. सोनम कपूरचा 'ब्लाईंड' या चित्रपटाचे देखील शुटिंग अर्धवट राहिले होते. नुकताच सोनमने सोसल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे, असे तिने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगितले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोम मखिजा यांनी केले आहे. सिरियल किलरच्या शोधात असलेल्या एका अंध पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट या चित्रपटात सांगितली आहे. सोनमने या चित्रपटाच्या शुटींगला गेल्या वर्षी डिसेंबरला सुरवात केली होती. स्कॉटलँडमध्ये 39 दिवस सुरु असणारं हे शूट आता पूर्ण झालं आहे

'ब्लाईंड'मध्ये तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात सोनम कपूर बरोबरच विनय पाठक, पूरब कोहली आणि लिलित दुबे ही तगडी स्टार कास्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.  या चित्रपटाची निर्मिती सुजय घोष, अविकेश घोष,मनिषा व्हि, प्रिन्स नाहार आणि सचिन नाहार यांनी केली आहे.हा चित्रपट 2022 ला थेटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT