Sonu Sood
Sonu Sood 
मनोरंजन

Video : सोनू सूद सायकलवरून करतोय ब्रेड, अंड्यांची होम डिलिव्हरी

स्वाती वेमूल

कोरोना महामारीच्या संकटात आणि लॉकडाउनमध्ये गरीबांची, गरजूंची जमेल त्या प्रकारे मदत करणारा अभिनेता सोनू सूद Sonu Sood हा जणू 'देवदूत'च ठरला आहे. आता या सोनू सूदने एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाचं नाव आहे 'सूद की सुपरमार्केट'. सोनूने सोशल मीडियावर त्याचा मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो सायकलवरून ब्रेड आणि अंडी विकताना दिसतोय. (Sonu Sood sells bread and eggs on a bicycle Watch video)

या व्हिडीओमध्ये सोनूने पांढरा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तो चालवत असलेल्या सायकलला पाव, ब्रेड, अंडी यांच्या पिशव्या लटकवेल्या आहेत. 'मोफत होम डिलिव्हरी, १० अंडी विकत घेणाऱ्यास एक ब्रेडचं पॅकेट मोफत', असं कॅप्शन त्याने या व्हिडीओला दिलं आहे. "कोण म्हणालं की मॉल बंद झाले? सर्वांत महत्त्वाचा आणि सर्वांत महागडं सुपरमार्केट आता तयार आहे. हे पहा, माझ्याकडे सर्वकाही आहे. प्रत्येकी सहा रुपयांची अंडी आहेत, ४० रुपयांचा ब्रेडचा पुडा आहे, छोट्या ब्रेडचा पुडा २२ रुपयांना आहे. सोबतच पाव, खारी, रस्क आणि खूप सारे चिप्ससुद्धा आहेत", असं तो या व्हिडीओत म्हणताना दिसतोय.

सोनूच्या या व्हिडीओला तब्बल १८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट्स करत त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी त्याला आशीर्वादसुद्धा दिला आहे. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने अनेक गरजूंची मदत विविधप्रकारे केली. अनेकांना रुग्णालयात बेड्स उपलब्ध करून दिले तर काहींना उपचारासाठी आर्थिक मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT