colors marathi : कलर्स मराठी वाहिनीवरील 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाच्या पाचव्या पर्वाला आता सुरुवात झाली आहे. काही दिवसातच या पर्वाची सर्वत्र हवा झाली आहे. आता या पर्वमध्ये मोठी घोषणा करण्यात आली. (sur nava dhyas nava) या कार्यक्रमाचं यंदाचं पर्व काहीसं वेगळं असणार आहे. कारण इतरवेळी अशा कार्यक्रमांमधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धकांना गाण्याच्या ऑफर मिळतात. या इथे मात्र स्पर्धकांना आताच स्वतःचं गाणं गाण्याची संधी मिळणार आहे.
(sur nava dhyas nava gives chance to sing song with professional music director offer to best participants in every week)
“सूर नवा “चा हा मंच प्रत्येक आठवड्यात रसिकांना एक नवा अनोखा नजराणा पेश करणार आहे. या पर्वात प्रत्येक आठवड्याच्या सर्वोत्तम गायकाला त्याचं स्वतःचं नवंकोरं गाणं देण्याचा विडा कलर्स मराठी आणि एकविरा प्रॅाडक्शन्सने उचलला आहे. संगीतमय रिॲलिटी शोच्या इतिहासातला भारतात तरी हा पहिलाच अनोखा असा उपक्रम आहे.
प्रत्येक आठवड्यात “सूर नवा ध्यास नवा”च्या मंचावर आपलं गाणं उत्तमोत्तम रित्या सादर करण्याचा ध्यास घेऊन सर्वोत्तम ठरणारा त्या त्या आठवड्यातील गायक सुवर्णकट्यार मिळवण्याचा मान मिळवतो. या पर्वात सुवर्णकट्यारीचा मान मिळवणाऱ्या त्या आठवड्यातील गायकाला मराठी संगीतक्षेत्रातील नावाजलेल्या संगीतकाराकडे सोपवले जाणार.. आणि त्या संगीतकाराकडून आपलं स्वतःचं नवंकोरं गाणं मिळवण्याची सुवर्णसंधी त्या गायकाला मिळणार आहे.
“सूर नवा ध्यास नवा “च्या या अभिनव उपक्रमातील ही पहिलीच सुवर्णसंधी सांगलीच्या शुभम सातपुते या गुणी गायकाने मिळवली असून विचारशील प्रसिध्द संगीतकार कौशल इनामदार यांनी संगीतबध्द केलेलं आणि कवी- गीतकार मिलिंद जोशी यांनी लिहिलेलं एक सुरेख नवं गाणं शुभम सातपुते याच्या नावावर नोंदवलं गेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.