

Cyclone Montha lashes Andhra Pradesh’s coastal region with heavy winds and rain, causing widespread damage and alerting disaster response teams.
esakal
Montha Cyclone Causes Havoc on Andhra Pradesh Coast : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मोथा चक्रीवादळ आता अधिक तीव्र झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, चक्रीवादळ मोंथा आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले आहे. यामुळे किनारी जिल्ह्यांमध्ये पाऊसासह सोसाट्याचा वारा वाहत आहे. किनारपट्टी भागास या चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा अलर्टमोडवर आहेत. शिवाय, पंतप्रधान मोदींनीही मुख्यमंत्री नायडू यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आहे.
आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक प्रखर जैन यांनी सांगितले की, गेल्या सहा तासांत चक्रीवादळ ताशी १८ किलोमीटर वेगाने पुढे सरकले आहे. उद्या (मंगळवार) सकाळपर्यंत ते तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर किनारी जिल्ह्यांतील रहिवाशांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षा सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी चक्रीवादळ मोंथाला तोंड देण्यासाठी राज्याला शक्य ती सर्व केंद्रीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. हवामान खात्यानुसार, चक्रीवादळ मोंथा मंगळवारी सकाळपर्यंत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होऊ शकते. तसेच, पंतप्रधान मोदींनी फोन करून चक्रीवादळाची तीव्रता आणि घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांबद्दल विचारपूस केली, असल्याचीही मुख्यमंत्री नायडू यांनी माहिती दिली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी चक्रीवादळाबाबत अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठकही घेतली. तसेच, मुख्यमंत्र्यांनी पाऊस आणि पूर येण्याची शक्यता असलेल्या भागात आधीच उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना कालव्याचे काठ मजबूत करण्यास सांगितले आहे.
याचबरोबर मुख्यमंत्र्यांच्या मते, समुद्रात गेलेल्या सर्व मच्छिमारांना किनाऱ्यावर परत आणण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी एनडीआरएफ, पंचायत राज अभियांत्रिकी पथक, रस्ते आणि इमारत अधिकारी आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना चक्रीवादळानंतर आवश्यक उपाययोजनांसाठी पूर्णपणे तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, अधिकाऱ्यांना लोकांना सतर्क राहण्याचे आणि चक्रीवादळाच्या वेळी बाहेर न जाण्याचा सल्ला देण्याचे आणि जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे सुचवले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.