The Great Khali, Allu Arjun’s 'Pushpa' character in image Google
मनोरंजन

'पुष्पा'च्या प्रेमात द ग्रेट खली! म्हणाला,'मैं झुकेगा नही';पहा व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल,४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला.

प्रणाली मोरे

'WWE'मध्ये भारताचा हा रेसलर पाहिला की खूप भारी वाटायचं. इंग्रजी मुस्तंड्यांच्या नाकात दम आणायचा तेव्हा तो भारतीय आहे याचा आपल्याला अभिमान वाटायचा. असा 'द ग्रेट खली'(The Great Khali) अनेकदा त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. पण आता त्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्याला ४ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेल्याचं दिसून आलं आहे. त्यानं त्याच्या इन्स्टाग्राम हॅंडलवर तो व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्या व्हिडीओमधून तो अल्लू अर्जूनचा(Allu Arjun) 'झुकेगा नही' डायलॉग रीक्रीएट करताना दिसत आहे. आता हा डायलॉग आपल्या खलीसाठी तर एकदम फिटच आहे ना राव.

'पुष्पा'(Pushpa :The Rise) सिनेमाला प्रदर्शित होऊन आता महिना उलटून गेला असेल पण त्या सिनेमाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. त्यातील डायलॉग आणि गाण्याचे व्हिडीओ रील तर अजूनही सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'पुष्पा' सिनेमाने देशात नुसता धुमाकूळ घातलाय तो असा. सेलिब्रिटींपासून,क्रिकेटर्सपर्यंत दिग्गजांनी 'पुष्पा'तील डायलॉग म्हणत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. खलीचा देखील हा व्हिडीओ तुफान व्हायरल झालाय तो इथे बातमीत आम्ही जोडत आहोत. खलीचे चाहते तर त्याच्या या व्हिडीओवर भलतेच खुश झालेले दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT