Tunisha Sharma esakal
मनोरंजन

Tunisha Sharma: पोस्टमार्टमसाठी तुनिषाचा मृतदेह जेजे रुग्णालयात, आज होणार अंत्यसंस्कार..

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केली. वयाच्या अवघ्या २०व्या वर्षीच तुनिषानं जगाचा निरोप घेतला. तिच्या मृत्यूनंतर मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.सर्वत्र तिच्या अचानक जाण्यानं हळहळ व्यक्त होत आहे.

तिचा मृत्यू हत्या की आत्महत्या याचा शोध पोलिस घेत आहे. त्यासाठी चौकशीही सुरु करण्यात आली असून या प्रकरणी तुनिशाची आई वनिता शर्मा यांनी तुनिशाचा को स्टार अभिनेता शीजान खान याच्याविरोधात वालीव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शीजान खान हा तिचा बॉयफ्रेंड असल्याचं बोललं जातं आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

मुंबईतील जेजे रुग्णालयात तिचा मृतदेहावर हलविण्यात आला असून आज तिचं शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांनतर आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतील मीरा रोड येथे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

दरम्यान तुनिशाने बाबा: दास्तान-ए-काबुल सीरियलच्या सेटवर शीजानच्याच मेकअप रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शीजाननं सांगितलं की, शुटिंग संपवून परत आलो. मेकअप रुमचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा तोडून आत शिरलो. त्यावेळी तुनिशानं आत्महत्या केली होती. शीजानला आज वसई कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

तुनिशा आणि शीजान दोघेही रिलेशनमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच दोघंच ब्रेकअप झालं होतं. यामुळे तुनिशा मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT