Tv Entertainment News Anupama actress  esakal
मनोरंजन

'अनुपमा' मालिकेला अनेरी वजानीचा रामराम, नवीन अभिनेत्रीची एंट्री

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका अनुपमा (Anupama Serial) प्रेक्षकांची नेहमीच लक्ष वेधून घेणारी मालिका ठरली आहे.

युगंधर ताजणे

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध मालिका अनुपमा (Anupama Serial) प्रेक्षकांची नेहमीच लक्ष वेधून घेणारी मालिका ठरली आहे. तिचा प्रेक्षकवर्गही मोठा आहे. अनेक वर्षांपासून अनुपमाला चाहत्यांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील महत्वाच्या पात्रांना प्रेक्षकांकडून दाद मिळाली आहे. अशातच (Bollywood news) एका अभिनेत्रीनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनुपमा या मालिकेत अनुज कपाडियाच्या (Anuj Kapadiya) बहिण मालविकाची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीनं मालिकेला रामराम ठोकला आहे. असं सांगितलं जातं की, ती एक वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेरीच्या जाण्याबद्दल चर्चा रंगली होती. ती यापुढे या मालिकेत दिसणार नाही.

आता अशी बातमी समोर आली आहे की, अनेरीची जागा ये रिश्ता क्या कहलाता है (Yeh Rishta Kya Kehlata Hai) मधील प्रसिद्ध अभिनेत्री मोहसीन खान (Mohsin Khan) घेणार आहे. तिची अनुपमामध्ये एंट्री होणार आहे. अनेरीही लवकरच खतरो के खिलाडीच्या बाराव्या सीझनमध्ये दिसणार आहे. मनोरंजन विश्वामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असणारी मालिका म्हणजे अनुपमा. या मालिकेचा टीआरपीही मोठा असल्याचे दिसून आले आहे. टीव्ही मालिकांचे जे रेटिंग सोशल मीडियावर व्हायरल होते. त्यामध्ये अनुपमा मालिका पहिल्य तीनमध्ये असल्याचे हे अनेकदा दिसून आले आहे. या मालिकेचा प्रेक्षकवर्ग पूर्ण भारतभर पसरला आहे. दरवेळी त्या मालिकेत येणारं टविस्ट प्रेक्षकांची उत्सुकता वाढविण्यावर भर देतं. त्यामुळे प्रेक्षकांचा अनुपमा मालिकेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली गांगुलीनं अनुपमामध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. त्याला प्रेक्षकांनी डोक्यावरही घेतलं आहे. मात्र आता तिच्या मालिकेतील एक महत्वाची अभिनेत्रीनं ती मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वामध्ये अनुपमा या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र अनुपमा मालिकेच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे ऑफिशियल स्टेटमेंट आलेले नाही. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, अनुपमा मालिकेतील अनेरी ही रोहित शेट्टीच्या खतरो के खिलाडी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

SCROLL FOR NEXT