Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर|Ranveer Singh's Reaction On Bollywood vs Tollywood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Ranveer Singh

Bollywood V/S South : तुला साऊथचे चित्रपट आवडतात का? रणवीर सिंगचं कडक उत्तर

Tollywood Vs Bollywood - टॉलीवूडच्या किच्चा सुदीपनं अजय देवगणच्या हिंदी राष्ट्रभाषा या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आणि एका वेगळ्या विषयाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड असा वाद सुरु झाला आहे. अजय देवगणनं (bollywood Movies) त्याच्या रण वे 34 या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा असल्याचे म्हटले होते. त्यावर सुदीपनं त्याच्यावर टीका केली. त्यानंतर कर्नाटक (Tollywood Actor) राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सुदीपची बाजु घेत अजयला झापले होते. दुसरीकडे दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. त्यात त्यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा नसून तमिळ ही देशातील सर्वात जुनी भाषा असल्याचे म्हटले होते. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगनं या विषयात उडी घेतली आहे.

रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अशी परिस्थिती असताना रणवीरनं हिंदी भाषा आणि टॉलीवूड तसेच कोणती चित्रपटसृष्टी जास्त महत्वाची वाटते यावर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पुष्पा, आरआरआर, केजीएफ यांनी तर बॉलीवूडपटांना चांगलाच दणका दिला आहे. त्यामुळे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बॉलीवूडच्या कोणत्याही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. थोडक्यात समाधान मानून या चित्रपटांनी कमाईसाठी ओटीटीचा पर्याय स्विकारल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: ईदच्या पार्टीत शहनाझ-सलमानची जवळीक कॅमेऱ्यात कैद; kiss करतानाचा Video Viral

सध्या जो हिंदी भाषेवरुन वाद सुरु झाला आहे त्यावर रणवीरनं सांगितलं की, बॉलीवूड असो किंवा टॉलीवूड यांचा बिझनेस कशाप्रकारे होतो आहे याविषयी मला फारशी काही माहिती नाही. मी एक व्यावसायिक कलाकार आहे. मला केवळ अभिनय करण्याचे पैसे मिळतात. त्यामुळे मला जर कोणते चित्रपट सरस आहे असं जर विचारलं तर सध्याच्या घ़डीला दाक्षिणात्य चित्रपटांचा जो जोर आहे तो सरस आहे. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. पॅन इंडिया अंतर्गत जे चित्रपट प्रदर्शित होत आहेत त्याला बॉक्स ऑफिसवर यश मिळालं आहे. मी दाक्षिणात्य चित्रपटांनी नक्कीच प्रभावित झालो आहे. त्याचे क्राफ्टिंग प्रभावी आहे. सगळ काही भारतीयच आहे. तेव्हा आपण उगाच भेदभाव करुन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये. अशी प्रतिक्रिया रणवीरनं दिली आहे.

हेही वाचा: Video : १३ जूनला पंढरपूर वारी, महिनाभरआधीच पालखीची तयारी

Web Title: Ranveer Singhs Reaction On Bollywood Vs Tollywood Films Which One Is Better

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top