
'मास्टरशेफ' अर्जुन तेंडुलकरचे वडिलांच्या पावलावर पाऊल! - Video Viral
आयपीएलचा (IPL 2022) धमाकेदार हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लीगमध्ये पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी (MI) हा हंगामा काही चांगला राहिला नाही. मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे त्यांच्या खेळाडूं मस्ती करताना दिसत आहे. या हंगामातही पदार्पणाची वाट पाहणाऱ्या अर्जुन तेंडुलकरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून स्वयंपाक करताना दिसत आहे. कुकिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Cooking Master Chef Mumbai Indians Camp)
हेही वाचा: श्रीलंकेत आंदोलकांनी पंतप्रधानांचे घर जाळले; Asia Cup 2022 धोक्यात
मुंबई इंडियन्सच्या धवल कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अर्जुन तेंडुलकर ज्यामध्ये स्वयंपाक करताना दिसत आहे. इथे अर्जुन चिकन भाजत आहे. धवल कुलकर्णीने व्हिडिओला मास्टरशेफ असे कॅप्शन दिले आहे. अर्जुन तेंडुलकर व्यतिरिक्त बेबी-एबीडी या नावाने प्रसिद्ध असलेले डेवाल्ड ब्रेविस देखील येथे स्वयंपाक करताना दिसले. अर्जुन तेंडुलकरला यावेळी पदार्पणाची संधी मिळाली नाही, पण डेवाल्ड ब्रेविसने काही सामने नक्कीच खेळले आहेत.
हेही वाचा: शुभमन गिलची धडाकेबाज कामगिरी; क्रिकेटच्या देवाशी केली बरोबरी
अर्जुन तेंडुलकरला वयाच्या २२ वर्षी या हंगामात खेळण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. अनेकवेळा अशी चिन्हेही आढळून आली. पण पुन्हा पुन्हा गोष्टी पुढे ढकलल्या जात होत्या. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक नुकतेच महेला जयवर्धने यांनीही अर्जुन तेंडुलकरच्या खेळण्याबाबत वक्तव्य केले होते आणि म्हटले होते की, त्याला आज पण संधी मिळू शकते, परंतु प्लेइंग-11 हा संघ संयोजन, सामन्याची स्थिती याच्या आधारावर ठरवला जातो.
Web Title: Sachin Tendulkar Son Arjun Tendulkar Cooking Master Chef Mumbai Indians Camp Mi Ipl 2020
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..