Urfi Javed: Esakal
मनोरंजन

Urfi Javed video: "शाहरुख मला तुझी दुसरी बायको बनव", उर्फीची 'पठाण'वर नजर

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed video: सध्या सर्वत्र शाहरुखच्या पठाणची चर्चा सुरु आहे. शाहरुखच्या चाहत्यांमध्ये पठाणची क्रेझ किती आहे हे तर चित्रपटाची कमाईच सांगत आहे. अनेक कलाकारांनी पठाण चित्रपटावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपल्या फॅशन आणि वादामुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीलाही शाहरुखची भुरळ पडली आहे. नुकतच तिला पापाराझींनी स्पॉट केलं. यावेळी तिला शाहरुखच्या पठाणबद्दल विचारल त्यावेळी तिनेही अशी काही प्रतिक्रीया दिली की ते ऐकून सर्वच हसू लागले.

उर्फीने म्हणाली की, तिला शाहरुख खानसोबत लग्न करायचं आहे. पापाराझीने तिला पठाणवर बॉयकॉट करण्याबद्दलही विचारलं त्याच बरोबर पठाणच्या यशावर उर्फी जावेद म्हणाली की, शाहरुख मला तुझी दुसरी बायको बनव.

पापाराझीने उर्फीला पठाणला बॉयकॉट बद्दल विचारल्यावर ती म्हणाली की, 'तुम्ही लोकं हवे तर माझ्यावर बहिष्कार टाका पण कृपया शाहरुख खानला बघा.'

यानंतर पापाजींनी पुन्हा विचारले की शाहरुखसाठी तुम्हाला काही मॅसेज द्यायचा आहे. उर्फी म्हणाली त्याचा काही फायदा होणार नाही. त्याला ते दिसणारचं नाही. त्यावर पापाराझी म्हणाले, नाही, ते सगळं पाहतात. यावर उर्फीने शाहरुखला आय लव्ह यू असं म्हणत 'मला तुझी दुसरी बायको बनव.' आता उर्फीचा हो व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहे.

उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ५ पैकी ५... RCB कडे आहे असा खेळाडू जो देतो चॅम्पियन बनण्याची गॅरंटी! आजपर्यंत कधी हरला नाही T20 फायनल

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानी मोर्चा

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

Mumbai News: मुंबईतील २५० अनधिकृत बांधकामांवर हातोडा, महापालिकेची धडक मोहीम

SCROLL FOR NEXT