Urfi Javed video: "इस फॅशन को क्या नाम दु"! सार्वजनिक ठिकाणी उर्फीचा पुन्हा जलवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tv entertainment news Actress Urfi Javed video

Urfi Javed video: "इस फॅशन को क्या नाम दु"! सार्वजनिक ठिकाणी उर्फीचा पुन्हा जलवा

उर्फी जावेद हे नावचं पुरे आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण उर्फी ही तिच्या कामापेक्षा जास्त तिच्या फॅशन आणि वादामुळं जास्त चर्चेत असते. उर्फी जावेद ही तिचा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वादामुळं जरा जास्तचं चर्चेत आली.

सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालण्याच्या आरोप करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. मात्र उर्फीही काही कमी नाही तिनेही चित्रा वाघ यांना तोडिस तोड प्रतिउत्तर दिले.

दोघांमध्ये चांगल शाद्बिक युद्ध रंगल होतं. इतकच नाही तर उर्फीनं थेट आत्महत्या करेल असंही म्हटंल. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून हा वाद शांत झालेला दिसला तोच आता पुन्हा उर्फी तिच्या नवीन फॅशन सह रस्त्यावर दिसली.

यावेळी तिने एक स्कर्ट परिधान केला होता. तर टॉप न घातला आईस्क्रीमच्या कोन तिचे ब्रेस्ट झाकलेले होते. ती गाडीतुन उतरताच सर्वांनाच तिने पुन्हा आश्चर्याचा धक्का दिला. सगळेच तिच्याकडे पाहत राहिले. यावेळी पापाराझींनी तिला घेरल.

तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तर अनेकांनी या व्हिडिओला प्रतिक्रियाही दिल्या आहेत . खरचं उर्फीच्या हिंमतीची दाद द्यावी लागेलं असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय.

उर्फी जावेद कपड्यांवर वेगवेगळे प्रयोग करत असते आणि त्यामूळे ट्रोलच्या निशाण्यावर येते. आत्तापर्यंत लोकांनी उर्फी जावेदला पोत्यापासून ब्लेड, लोखंडी साखळी, इलेक्ट्रिक वायर ते मोबाइल सिमपर्यंत बनवलेल्या ड्रेसमध्ये पाहिले आहे. आता उर्फी जावेदने पुन्हा एकदा बोल्डनेसची हद्द पार केली आहे.