Animal Video Leaked: Animal च्या सेटवरून व्हिडिओ लीक! रणबीर कपूरचा 'गँगस्टर' अवतार पाहून चाहते येडे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Animal Video Leaked

Animal Video Leaked: Animal च्या सेटवरून व्हिडिओ लीक! रणबीर कपूरचा 'गँगस्टर' अवतार पाहून चाहते येडे...

बॉलिवू़ड अभिनेता रणबीर कपुर हा सध्या त्याच्या 'तू झूठी मैं मक्कार' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच रिलिज झाला,जो प्रेक्षकांना खुप आवडला. यात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरसोबत रोमांस करतांना दिसतोय. मात्र एकीकडे एक रोमँटिक हिरोचा रोल करत असतांनाच दुसरीकडे तो रश्मिका मंदान्नासोबत संदीप रेड्डी वंगाच्या 'एनिमल'मध्ये रावडी लूकमध्ये दिसणार आहे.

'एनिमल'चित्रपटाचं पोस्टरही रिलिज करण्यात आलं तेव्हा हे रणबीर कपुर आहे यावर त्याच्या चाहत्यांनाही विश्वास बसला नाही. रणबीरचे चाहते त्याच्या या चित्रपटासाठी खुप उत्सूक आहे. या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरु असून रणबीर यात व्यस्त आहे.

हेही वाचा- ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

सध्या या चित्रपटातून रणबीर कपूरचा बोल्ड लूक पाहायला मिळाला आहे. चित्रपटाच्या सेटवरून एक व्हिडिओ लीक झाला आहे. यामध्ये रणबीर नेव्ही ब्लू थ्री पीस सूट, लांब केस, दाढीमध्ये दिसत आहे. त्याचा हा लूक पाहण्यासाठी त्याचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती रेंज रोव्हरच्या गाडीतून शस्त्रे काढत आहे तर रणबीर सिगारेट ओढत कारच्या दिशेने चालत असताना त्याचा पाठलाग करत आहेत. दुसर्‍या व्हिडिओमध्ये रणबीर शॉटची तयारी करताना आणि सिगारेट पेटवताना दिसत आहे.

हा लूक पाहून चाहते तो 'गँगस्टर' च्या भूमिकेत असावा असा अंदाज लावत आहेत. हा सीन खुपच आकर्षक आहे. अशी कमेंटही काही युजर्सनी केली. रणबीर कपूरच्या लूकवर लोकांनीही आश्चर्य व्यक्त केले. 'एनिमल'मध्ये रणबीर कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार आहे, याची माहिती सध्या निर्मात्यांनी शेअर केलेली नाही. 'एनिमल' 11 ऑगस्ट 2023 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे