Vaibhavi Upadhay  esakal
मनोरंजन

Vaibhavi Upadhay : 'खूप लवकर सोडून गेलीस!' वैभवीच्या जाण्यानं अनुपमा फेम रुपालीला रडू आवरेना!

अनुपमा फेम रुपाली गांगुलीनं वैभवीला श्रद्धांजली वाहिली आहे.तिनं लिहिलेल्या पोस्टमध्ये वैभवी तू फार लवकर आम्हाला सोडून गेलीस. तुझ्या जाण्याचे खूप दु:ख आम्हाला आहे.

युगंधर ताजणे

Vaibhavi Upadhyaya Death - टीव्ही मनोरंजन विश्वाला गेल्या काही दिवसांपासून मोठे धक्के बसताना दिसत आहे. मागील चार दिवसांत सहा सेलिब्रेटींचा मृत्यू झाल्यानं चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. साराभाई वर्सेस साराभाई मध्ये जॅस्मिनची भूमिका करणाऱ्या वैभवी उपाध्यायच्या जाण्यानं चाहत्यांना शोक अनावर झाला आहे.

अनुपमा फेम रुपाली गांगुलीनं वैभवीला श्रद्धांजली वाहिली आहे.तिनं लिहिलेल्या पोस्टमध्ये वैभवी तू फार लवकर आम्हाला सोडून गेलीस. तुझ्या जाण्याचे खूप दु:ख आम्हाला आहे. तुझ्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी ही काही भरुन येणारी नाही. असे रुपालीनं म्हटले आहे. तिच्या त्या पोस्टवर चाहत्यांनी देखील विविध कमेंट्स करुन वैभवीला आदरांजली वाहिली आहे. वैभवीच्या जाण्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता आदित्य सिंह राजपूत याचाही मृत्यू झाल्याच्या बातमीनं चाहत्यांवर शोककळा पसरली होती.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे वैभवीचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशातील एका रस्त्यावर वैभवीचा अपघात झाला. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी तिनं जगाचा निरोप घेतला. अभिनेता आणि निर्माते जेडी मजेठिया यांनी वैभवीच्या जाण्यानं शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्ट शेयर करुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मला तर विश्वासच बसत नाहीये. वैभवीचे जाणे मनाला वेदना देणारे आहे. ती एक चांगली अभिनेत्री होती.

Vaibhavi Upadhyaya Death

साराभाई वर्सेस साराभाईमध्ये वैभवीची सहकलाकार असणारी रुपाली गांगुलीनं देखील खास पोस्ट शेयर करत तिची भावना व्यक्त केली आहे. वैभवीचं जाणं खूपच धक्कादायक आहे. तू खुपच लवकर निघून गेलीस, अशा शब्दांत अनुपमानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT