Vikram Movie Kamal Haasan Actor Surya  esakal
मनोरंजन

Vikram Movie: फक्त एक रुपया मानधन? अभिनेता सुर्यानं सांगितलं कारण...

टॉलीवूडचा गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये भलताच बोलबाला आहे.

युगंधर ताजणे

Vikram Suriya Action Scene: टॉलीवूडचा गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमध्ये भलताच बोलबाला आहे. जे कोणते चित्रपट टॉलीवूडचे प्रदर्शित होत आहेत त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. त्याचे कारण टॉलीवूडच्या चित्रपटांचे विषय. काही दिवसांपूर्वी सलमान खान, आमिर खान यांनी बॉलीवूडच्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांना यापुढील काळात कोणती (Vikram Movie) काळजी घ्यावी लागणार आहे याविषयी सांगितले होते. शोले च्या काळातील हिरोइसम आपल्याला पुन्हा आणावा लागणार आहे. असे त्या कलाकारांनी सांगितले होते. या गोष्टींना पुन्हा उजाळा द्यायचे कारण म्हणजे प्रसिद्ध अभिनेता कमल हासन यांचा विक्रम नावाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करतो आहे. तो प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे.

(Tollywood Vs Bollywood)टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सुर्या यानं कमल हासन, विजय सेतूपतिच्या विक्रम या चित्रपटामध्ये पाच मिनिटांचा रोल केला होता. मात्र त्या भूमिकेसाठी सुर्यानं कोणत्याही प्रकारचं मानधन घेतलं नव्हतं. त्यामागील (Tollywood Movies) कारण आता व्हायरल झालं आहे. ते कारण जेव्हा सुर्याच्या चाहत्यांना कळलं तेव्हा मात्र त्यांनी सुर्यांचे अभिनंदन केले आहे. ज्या कारणासाठी त्यानं हे मानधन नाकारले ते योग्यच होते. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सुर्याला (Bollywood news) त्याच्या चाहत्यांनी दिल्या आहेत. विक्रममध्ये सुर्यानं पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर विक्रमच्या विक्रमी कमाईची लाट सुरु आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. तीन दिवसांत या चित्रपटानं दीडशे कोटींचा बिझनेस केल्याचे दिसून आले आहे.

साऊथच्या अनेक चित्रपटांनी पॅन इंडिया अंतर्गत चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्याला मिळणारा प्रतिसादही तितकाच मोठा आहे. मात्र ही गोष्ट बॉलीवूडसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. गेल्या वर्षीपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोरोनाच्या काळात देखील या चित्रपटांनी प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळवली आहे. दाक्षिणात्य चित्रपटांची कथा, दिग्दर्शन, त्याचे निर्मितीमुल्य या गोष्टींना नेटकऱ्यांनी मोठी दाद दिली आहे. विक्रम चित्रपट या साऱ्या अटींवर खरा ठरला आहे. सध्या सुर्याच्या कॅमिओची चर्चा आहे. त्यासाठी त्यानं मानधन केवळ एक रुपया घेतल्याची चर्चा आहे.

आपण जे मानधन घेतलं त्याचे मुख्य कारण प्रसिद्ध अभिनेते कमल हासन हे आहेत. असे सुर्यानं सांगितले आहे. एका रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. सुर्या हा कमल हासन यांचा मोठा चाहता आहे. तो त्यांना आपला आयडियल मानतो. त्यामुळे त्यानं केवळ एक रुपया मानधन केल्याची चर्चा आहे. मी माझ्या आवडत्या अभिनेत्यासाठी काहीही करु शकतो. आणि मला ते करायचे आहे. त्यामुळे मी कोणत्याही मानधनाविना काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: बँकेची कामं आजच करा! चार दिवस बँका राहणार बंद? कधी पासून जाणून घ्या

Duleep Trophy Final: ३० चौकार अन् ७ षटकार... ईशान किशन बरसला, पण त्रिशतक हुकलं; संघाच्या तब्बल ७०० धावा पार

नालासोपारा शहराचे नाव बदलणार, प्राचीन ऐतिहासिक वारशाला नवी ओळख मिळणार; महापालिकेचे महत्त्वाचे पाऊल

Marathi News Live Updates: कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर कोथरूडकर एकवटले

MPSC Irregularities Issue : ‘एमपीएससी’ गैरप्रकारांविरोधात पुण्यात विद्यार्थ्यांचा आक्रोश; तीन दिवसांत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT