
Video Viral: कंगनाचा नादच नाय! नाकाला जीभ लावून अनन्याची उडवली खिल्ली...
Bollywood Actress: बॉलीवूडची क्वीन असं स्वताला म्हणवून घेणारी कंगना सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. (Kangana Ranaut) सोशल मीडियावर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी कंगना अनेकदा त्या वक्तव्यांमुळे चर्चेत आली आहे. तिच्यावर (Bollywood News) कोर्टात तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहे. मात्र यासगळ्याचा कंगनावर कोणताच परिणाम झालेला नाही. अदयापही ती तिच्या (Ananya panday) वेगवेगळ्या कारणांमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. येत्या दिवसांत तिचा धाकड नावाचा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. त्यामध्ये कंगना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवरुन तिनं बॉलीवूडमधील शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्याशी देखील पंगा घेतला आहे. आताही कंगना तिच्या तऱ्हेवाईक वागण्यानं चर्चेत आली आहे.
कंगना आणि करण जोहरचा छत्तीसचा आकडा सर्वांना माहिती आहे. कंगनानं त्याच्यावर नेपोटिझमचा आरोपही केली होता. त्याच्यावर कडाडून टीकाही केली होती. आपल्या चित्रपटाचा प्रोमो किंवा ट्रेलर ज्यावेळी प्रदर्शित होतो तेव्हा त्याला बॉलीवूडमधील एकाही सेलिब्रेटीकडून कौतुकाची पावती येत नाही. बॉलीवूड माफिया हे केवळ त्यांच्याच मर्जीतील कलाकारांच्या पोस्टला लाईक्स करतात. असा आरोप कंगनानं केला होता. कंगनाच्या या वक्तव्यावरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. अनेक बॉलीवूडच्या कलाकारांनीही तिच्यावर टीका केल्याचे दिसून आले होते. कंगना तिच्या धाकडच्या प्रमोशन शो साठी कपिल शर्मा शोमध्ये आली होती. तेव्हा तिनं स्टारकिड अनन्या पांडेची टिंगल केल्याचे दिसून आले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
त्या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा कंगनाला विचारतो की, बॉली बिम्बो म्हणजे काय आहे, त्यावेळी कंगनानं अनन्याचे नाव न घेता तिच्यावर कॉमेंट केली. तिनं आपली जीभ नाकाला लावत अनन्या सारखा आवाज काढून गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणते, असंच होतं जेव्हा काही लोकं आपली जीभ नाकाला लावण्याचा प्रयत्न करतात. मी पण माझी जीभ ही नाकाला लावू शकते. त्यानंतर कपिलनं अनन्या पांडेची व्हिडिओ क्लिप दाखवून कंगनाला आश्चर्यचकित केले आहे. हे माझं कौशल्य आहे. असं त्या व्हिडिओमध्ये अनन्यानं म्हटलं आहे. कंगनानं कपिलच्या शो मध्ये त्याचीही टिंगल केली होती. त्यामुळे कपिलही बराच काळ नाराज होता.