Kieron Pollard
Kieron Pollard  Sakal
मनोरंजन

Kieron Pollard Missing: 'पोलार्ड हरवलाय, शेवटचा दिसला..', ब्रावोची पोस्ट

दत्ता लवांडे

कायरन पोलार्ड (Kieron Pollard) हरवला आहे. तो कुणाला दिसला तर पोलिसांना कळवा अशी मजेशीर पोस्ट वेस्ट इंडिजचा खेळाडू ब्रावोने आपल्या क्रिकेट कर्णधाराविषयी केला आहे. त्याने त्या पोस्टमध्ये त्याचा फोटो टाकून माहीतीसुद्धा टाकली आहे. हा कुणाला सापडल्यास वेस्ट इंडिजला कळवा असंही त्याने लिहिलंय.

प्रत्येक खेळाडू आपल्या सहकाऱ्यांची चेष्टा मस्करी करत असतो. प्रत्येक खेळात आपल्याला ते बघायला मिळतं. सध्या वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर असून भारताकडून पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात या संघाला हार पत्करावी लागली आहे. एकदिवसीय मालिका भारताने आपल्या नावे केली आहे. त्यानंतर या दोन संघामध्ये T20 मालिका होणार आहे. दरम्यान वेस्ट इंडिज संघाचा अष्टपैलू खेळाडू ब्रावोने ही मजेशीर पोस्ट केली आहे.

कायरन पोलार्ड हा वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार आहे, ''शेवटचा तो युजवेंद्र चहलच्या पाकिटात दिसला होता. वय - ३४, उंची- १.८५ मीटर असून कुणाला दिसल्यास मला किंवा पोलिसांना कळवा.'' असा मजेशीर मजकूरही त्याने लिहिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT