Amitabh Bachchan Google
मनोरंजन

शूटिंग करताना अमिताभ बच्चननी का फोडला कॅमेरा?

सोशल मीडियावर 'बिग बी' यांनी फोटो पोस्ट करत त्यामागची कहाणी सांगितली आहे.

प्रणाली मोरे

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मीडियावर अधिक सक्रिय पहायला मिळतात. ते नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यातले, शुटिंगच्या सेटवरचे किंवा आपल्या नव्या प्रोजेक्ट संदर्भातल्या अपडेट्स देण्यासाठी फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून नवनवीन पोस्ट करताना दिसतात. त्यांच्या पोस्टवर देखील त्यांचे चाहते मोठ्या उत्साहानं आपल्या प्रतिक्रिया नोंदवतात. नुकताच अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शुटिंगच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आणि त्याची चर्चा सगळीकेड होऊ लागलीय.

अमिताभ यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर शूटिंगच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. जो त्यांच्या आगामी सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचा आहे. आणि त्यांनी तो फोटो पोस्ट करून लिहिलंय,''मी वयाची ८० गाठायला आलोय पण काही गोष्टी कशा बदलल्या नाहीत हे आजही अनुभवतो''. तो फोटो सिनेमातील अॅक्शन सीक्वेन्स शूट करतानाचा आहे. अमिताभ त्या फोटोत एक भलीमोठी काच फोडताना दिसत आहेत. तो फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं आहे,''वय वर्ष ८० आणि ५३ वर्षांनंतरही''...काही गोष्टी कधीच बदलत नाहीत. ...अॅक्शन''.

अमिताभ यांच्या या फोटोवर अभिनेत्री उषा जाधवनं पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. तिनं या फोटोवर हार्ट इमोजी कमेंट बॉक्समध्ये पोस्ट केला आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. अमिताभ यांच्या एका चाहत्यानं लिहिलंय की,''हिंदी सिनेमांचा हा इतिहास आहे की जेव्हा पण अमिताभ यांची एन्ट्री पडद्यावर झालीय तेव्हा शिट्टयांचा आवाज आणि तुमच्या नावाची घोषणा झाली नाही असं कधीच घडलं नाही. आणि हे ना कधी कुठे पाहिलंय ना कधी पहायला मिळेल. तुमच्या इतकं प्रेम कधी कुठल्या इतर स्टार्सला चाहत्यांनी दिलं असेल असं वाटत नाही. तुम्ही ईश्वराची एक अद्भुत निर्मिती आहात''. तर एकानं त्यांना ''लिजेंड'' म्हणत प्रशंसा केलीय.

अमिताभ यांनी अॅक्शन सीक्वेन्स शूट करतानाचे काही जवळून क्लिक केलेले फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्या फोटोत ते बेसबॉलची बॅट कॅमेऱ्याच्या दिशेने फेकताना दिसत आहेत. जणू ते आता कॅमेरा फोडणारच आहेत असा भास तो फोटो पाहताना होईल. अमिताभ सध्या नागा अश्विन यांच्या 'Project K' सिनेमात काम करीत आहेत. तसंच,४ मार्चला नागराज मंजुळे दिग्दर्शित 'झुंड' या सिनेमात ते एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

Latest Marathi News Live Update: कर्नाटक कॉंग्रेसचे आमदार खर्गेंच्या भेटीला

Pune Crime: गुन्हे शाखेकडून वाघोलीतील हातभट्टी जेसीबीने उद्ध्वस्त; दोन लाखाचा मुद्देमाल नष्ट, गुन्हे शाखेचा छापा!

SCROLL FOR NEXT