गंगूबाई काठियावाडी:नेहरूंवरील 'तो सीन एडिट; मगच मिळालं UA certificate

सिनेमातील काही महत्त्वाच्या दृश्यांना कात्री लागल्याची चर्चा सुरू आहे.
Alia Bhatt in 'Gangubai Kathiawadi'
Alia Bhatt in 'Gangubai Kathiawadi'Google

'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiwadi) सिनेमा अनेक वादांनी घेरला असला तरी आता सेन्सॉर बोर्डानं UA सर्टिफिकेट देऊन सिनेमाला हिरवा कंदिल दिला आहे. पण बातमी समोर येतेय की या सिनेमातील काही महत्त्वाच्या दृश्यांना मात्र कात्री लावण्यात आली आहे. या सिनेमात आलिया (Alia Bhatt) लीडची म्हणजे 'गंगूबाई' व्यक्तिरेखा साकारणार आहे. हा सिनेमा हुसैन जैदी यांच्या 'माफिया क्वीन' पुस्तकापासून प्रेरित आहे. एका स्त्रीचा संघर्ष या सिनेमात आपण पाहणार आहोत. अजय देवगणही या सिनेमात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकरताना दिसणार आहे.

नुकताच हा सिनेमा बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवला गेला अन् कौतूकास पात्रही ठरला. आलिया आणि संजय लीला भन्साली यांनी बर्लिनमधील फिल्म फेस्टीवलमधील या सिनेमाच्या वर्ल्ड प्रीमियरला विशेष उपस्थिती दर्शवली होती. २५ फेब्रुवारी सिनेमा आता सज्ज आहे सिनेमागृहात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांना भेटण्यासाठी. पण या सिनेमात काही महत्त्वाचे सीन बदलण्यात आलेयत,त्यांना कात्री लागलीय असंही बोलण्यात येत आहे. काय होतं त्या सीनमध्ये?

Alia Bhatt in 'Gangubai Kathiawadi'
आलिया-रणबीर 'यंदा कर्तव्य नाही!';अभिनेत्रीनेच सांगितलं कारण

या सिनेमात एक शिवी वापरण्यात आली होती,अर्थातच तिला बदलून जो नवीन शब्द तिथं आणला गेलाय तो पाहिलात की ती शिवी कोणती होती हे येईलच लक्षात. तर त्या शिवीऐवजी आता 'मादरजात' हा शब्द आला आहे. तसंच १७ सेकंदाचा मोठा डायलॉग आणि व्हिज्युअल्सही या सिनेमातनं वगळण्यात आले आहेत. या सिनेमात आणखी एक मोठा बदल करण्यात आलाय. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कदाचित त्या सीनवरुन मोठा वाद होण्याची शक्यता होती असं कळतंय. तर या सिनेमात तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू आणि गंगूबाई यांच्या भेटीचा सीन काहीसा बदलण्यात आला आहे. त्या दोघांमधलं ४३ सेकंदाचं संभाषण वगळण्यात आलं आहे. गंगूबाईच्या खांद्यावर पंडीत नेहरु गुलाबाचं फूल लावतात त्या सीनमध्ये बदल केला गेला आहे.

Alia Bhatt in 'Gangubai Kathiawadi'
'आधी Air India आता Go Air'; स्टाफला शिष्टाचार शिकवा; चित्रांगदा भडकली

हुसैन जैदी यांच्या पुस्तकात गंगूबाई आणि नेहरूजी यांच्या भेटीविषयी भाष्य केलं गेलं आहे. त्यांनी लिहिलं आहे,''गंगूबाई नेहरुंसमोर एक प्रस्ताव ठेवतात.ज्यात त्या नेहरुंना म्हणतात जर तुम्ही मला तुमची बायको बनवलंत तर मी माझे सगळे धंदे बंद करीन. तेव्हा नेहरु गंगूबाईवर चिडून पुन्हा असं बोलण्याची हिम्मतही करू नकोस म्हणत दरडावतात. तेव्हा गंगूबाई म्हणतात की,''रागावू नका प्रधानमंत्रीजी मला फक्त हेच सिद्ध करायचं होतं की,बोलणं सोपं असतं,प्रत्यक्षात करणं कठीण असतं. आणि गंगूबाईपुढे नेहरु काहीच बोलू शकत नाहीत त्यानंतर''. आता जर असा सीन प्रत्यक्षात दाखवला असता तर सिनेमा राहिला एका बाजूला,नसता वाद सुरू झाला असता हे नक्की. सेन्सॉरने पुढील संभाव्य धोके लक्षात घेऊनच तो सीन बदलण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com