Accident near Allahabad Of Vasamat devotees vehicle
Accident near Allahabad Of Vasamat devotees vehicle 
मराठवाडा

वसमतच्या भाविकांच्या वाहनाला अलाहाबाद जवळ अपघात

पंजाब नवघरे

वसमत - बागलपार्डी (ता.वसमत, जि. हिंगोली) येथील भाविकांच्या जीपला अलाहाबाद जवळ झालेल्या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. रविवारी (ता. 7) पहाटे हा अपघात घडला आहे. 

वसमत तालुक्यातील काही भाविक एक खाजगीबस व क्रुझर जीप घेऊन (क्र.एमएच-38-व्ही-3777) यात्रेसाठी गेले होते. काशी येथून ते अयोध्येस आले होते. आज सकाळी परतीच्या मार्गावर निघाले होते. सकाळी साडेचार वाजता अलाहाबाद जवळील दबाब तलाव भागात महामार्गावर समोरील ट्रकचालकाने (क्र. युपी-70-एटी-7077) अचानक ब्रेक लावल्याने क्रुझर चालक विट्ठल मुरलीधर पांचाळ (रा. शिरला, ता. वसमत) यांना वाहनावर नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे क्रुझर जीप थेट ट्रकवर आदळली. या अपघातात जीपमधील मारोतराव नागोराव बागल (वय55, रा. बागल पार्डी) यांचा मृत्यू झाला. 

तर राधाबाई बेले (रा. धामणगाव), ज्ञानदेव डाऊजी माहोरे (रा. शिरला), महानंदा शिवाजी हरबले (रा. धामणगाव), किशन मोहनाजी खंदारे (रा.भोगाव) व चालक श्री.पांचाळ हे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी खासदार ॲड. राजीव सातव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. खासदार ॲड. सातव यांनी अलाहाबाद येथील काँग्रेसचे पदाधिकारी श्री. चौधरी, श्री. तिवारी यांच्यासह सुमारे पंचेविस कार्यकर्ते वाहनांसह पाठविले. या कार्यकर्त्यानी तसेच पोलिसांनी घटनास्थळावरून जखमींना अलाहबाद येथील रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करून वसमतकडे रवाना केले आहे. तर मयत श्री. बागल यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे वसमतकडे पाठविण्यात आला आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: अमित शहांच्या एडिटेड व्हिडिओ प्रकरणी तेलंगानाच्या मुख्यंत्र्यांना समन्स

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT