Accident by sand truck one death
Accident by sand truck one death  
मराठवाडा

वाळू टिप्परच्या धडकेत युवकाचा मृत्यू

कमलेश जाब्रस

जि. बीड, माजलगांव : अवैध रित्या वाळू वाहतुक करणाऱ्या व भरधाव वेगाने असलेल्या हायवा टिप्परने लोणगाव येथे मागील तिन दिवसांपूर्वी शहरातील झेंडा चैक भागातील रहिवासी असलेले पुरूषोत्तम जोशी वय 38 वर्षे यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज (ता. 10, रविवार) घडली आहे. 

शहरातील झेंडा चैक भागातील रहिवाशी पुरूषोत्तम जोशी जयगावकर हे लोणगाव फाट्यावरून जात असतांना नदीपात्रातून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा क्रं. एम. एच. 20 ए. टी. 101 टिप्परने जयगावकर यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्याला व पायाला गंभिर दुखापत झाली होती. त्यामुळे औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असतांना रविवारी त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT