मराठवाडा

आता एक झाड तोडले, तर लावावी लागणार दोन झाडे

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीमध्ये (ऑरिक) औरंगाबाद इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेडतर्फे (एआयटीएल) स्वतंत्र सहा सदस्यीय वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे आता ॲरिकमध्ये झाड तोडायचे असेल; तर त्याची परवानगी या वृक्ष प्राधिकरणाकडून घ्यावी लागणार आहे. एवढेच नाही तर जेवढी झाडे तोडली त्याच्या दुप्पट झाडांचे पंधरा दिवसांत रोपण करावे लागणार आहे. 

महाराष्ट्र वृक्षसंवर्धन आणि सुरक्षा कायद्याअंतर्गत विशेष नियोजन म्हणून अशा प्रकारचे प्राधिकरण गठित करण्याचा अधिकार आहे. त्याचआधारे निसर्गाचा समतोल कायम राहावा, या हेतूने एआयटीएलने या वृक्ष प्राधिकरणाची स्थापना केली आहे. त्यामुळे आता ॲरिकमध्ये एकही झाड तोडायचे असेल; तर या प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यामध्ये व्यवस्थापकीय संचालक अध्यक्ष, सहव्यवस्थापकीय संचालक सदस्य, एजीएम टाऊन प्लॅनिंग सदस्य, वरिष्ठ अभियंता (एजीएम इन्फ्रास्ट्रक्‍टर) सचिव, कनिष्ठ अभियंता (मॅनेजर इन्फ्रास्ट्रक्‍टर) सदस्य, सीएसटूएम कंपनीचा एक प्रतिनिधी सदस्य अशा सहा जणांचा समावेश आहे. या प्राधिकरणच्या कार्यासाठी मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आली आहेत. यामध्ये तोडण्यात आलेल्या झाडांचा मोबदला म्हणून तोडलेल्या वृक्षांच्या संख्येच्या दुप्पट झाडे १५ दिवसांत लावावी लागणार आहेत आणि त्याला ई-लॅण्ड मॅनेजमेंट सिस्टीमशी जोडण्यात येणार आहे.

असे काम करणार प्राधिकरण
  झाड तोडण्यासाठी प्राधिकरणाला अर्ज करावा लागणार. 
  त्या वृक्षाबाबतची वृत्तपत्रात जाहिरात देऊन १२ दिवसांत रिपोर्ट सादर करावा लागणार. 
  संबंधित ठिकाणांचे फोटो सादर न केल्यास ट्री ऑफिसरला जागेची पाहणी करून ४८ तासांत त्याचा अहवाल सादर करावा लागणार. 
  अर्ज प्राप्त झाल्याच्या ४५ दिवसांत वृक्ष प्राधिकरणाला तो निकाली काढावा लागणार. ६० दिवसांत निकाली न निघाल्यास परवानगी मिळाली असे गृहीत धरता येणार. 
  तोडली जाणारी झाडे २५ पेक्षा कमी असतील; तर तो अर्ज निकाली काढण्याचे अधिकार व्यवस्थापकीय संचालकांकडे असणार आहेत.  
  परवानगी मिळाली, की तोडलेल्या झाडांच्या संख्येपेक्षा दुप्पट झाडे तोडणाऱ्याला लावावी लागणार आहेत. (झाड तोडल्याच्या १५ दिवसांत).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT